कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या दापोरी – सालबर्डी – मोर्शी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे ! 

– सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे दापोरी येथील नागरिक त्रस्त ! 

– काँक्रिट नाली पेव्हर ब्लॉक अप्रोच रोड चे अपूर्ण कामे करण्यास टाळाटाळ ! 

मोर्शी :- मोर्शी तालुक्यातील दापोरी सालबर्डी रस्ता तीर्थक्षेत्र संत्राप्रकीया उद्योगास जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्याची सुधारणा करण्या करिता हायब्रीड एन्यूटी प्रकल्पा अंतर्गत या रस्त्याचे काम कोट्यावधी रुपये खर्च करून करण्यात आले मात्र वेल्सपन इम्फ्रा प्रा. लि. कंपनी व संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या मार्गाचे काम ६ वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा दापोरी गावातील अपूर्ण कामे अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा पूर्ण करण्यास वेल्सपन इम्फ्रा प्रा. लि. कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग तयार नसल्यामुळे दापोरी गावामध्ये विविध प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहे. वेल्सपन इम्फ्रा प्रा. लि. कंपनी व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून ८ दिवसामध्ये अपूर्ण कामाला सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी दिला आहे.

मोर्शी तालुक्यातील दापोरी डोंगर यावली सालबर्डी पाळा मोर्शी रस्ता प्रजीमा ६६ कि.मी. ०/०० ते १५/६०० औधोगिक दृष्ट्या महत्वाच्या संत्राप्रकीया उद्योग व तिर्थक्षेत्रास जोडणाऱ्या रस्त्याची सुधारणा करण्या करीता हायब्रीड एन्यूटी प्रकल्पा अंतर्गत १ डीसेंबर २०१६ रोजी शासन निर्णय काढून प्रशासकीय मान्यता दिली मात्र ६ वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा सदर रस्त्याचे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नसल्या मुळे दापोरी येथील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सदर रस्त्याचे काम वेल्सपन इम्फ्रा प्रा. लि. कंपनीणे घेतले असून दापोरी सालबर्डी रस्त्याच्या बाजूचे दापोरी येथील गावातील सांडपाणी वाहून नेण्याकरिता काँक्रिट नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून उर्वरित नालीचे बांधकाम अर्धवट सोडून दिल्यामुळे या मार्गावरील पावसाळ्यातील पाणी नागरिकांच्या घरात घुसून मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच रस्त्याच्या लगत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुद्धा कंपनीने केलेले नसल्यामुळे गावात जाणारे महत्वाचे रस्ते महत्वाचे रस्ते बंद आहे. सदर रोडच्या बाजूला नाली अप्रोच रोडचे काम पूर्ण करण्यात आले नसल्यामुळे गावातील नागरिकांना गावामध्ये जाण्यास अडचण निर्माण होत असून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी या गंभीर प्रकाराबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार वेल्सपन कंपनीला अनेक वेळा निवेदन देऊन कळविले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदार यांनी तक्रारीला केराची टोपली दाखविल्यामुळे तक्रारीची दखल कोणीही घेतांना दिसत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात रोष निर्माण होतांना दिसत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदाराच्या दावणीला –

दापोरी सालबर्डी रस्ता तीर्थक्षेत्र संत्राप्रकीया उद्योगास जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्याची सुधारणा करण्या करिता हायब्रीड एन्यूटी प्रकल्पा अंतर्गत या रस्त्याचे काम कोट्यावधी रुपये खर्च करून सुरू करण्यात आले मात्र शासनाने मंजूर केलेल्या दापोरी डोंगर यावली, सालबर्डी पाळा मोर्शी या महत्वाच्या महामार्गाचे काम प्रशासकीय विभागाला हाताशी धरून बिल काढून महत्वाच्या महामार्गाचे काम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे शासनाला कोट्यवधींचा चुना लावण्याचा प्रकार सुरु असून ‘विकास हवा पण ठेकेदार आवरा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

– रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर पुलिस ने दो दिवसीय कार्यशाला में किया बाल न्याय व्यवस्था पर मंथन

Sat Jun 22 , 2024
नागपुर :- बाल-अनुकूल पुलिसिंग की ओर एक और कदम बढ़ाते हुए, नागपुर शहर पुलिस ने बाल न्याय व्यवस्था पर दो दिवसीय कार्यशाला का आयोजन किया। शहर पुलिस और स्वयंसेवी संगठन ‘प्रकृति ट्रस्ट’ के संयुक्त तत्वावधान में सी पी भवन सभागृह में आयोजित इस संगोष्ठी का आज समापन हुआ। “देश के बीचोंबीच मौजूद नागपुर शहर अक्सर नाबालिगों सम्बंधित अपराधों में यातायात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com