संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी – ११ मार्च ला दुपारी दोन वाजता दरम्यान कन्हान नदी पात्रात एकाएक पाणी आले. याबाबत नदी काठावर डांगरवडी करणाऱ्या समाज बांधवांना भ्रमणध्वनिवर संपर्क साधला असता एकाएक नदीला पाणी आल्याचे सांगण्यात आले. याबाबत प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्यात आला. भोई धीवर व उपजातीच्या नुकसान झालेल्या कन्हान नदीपात्रातील वाहून गेलेल्या डांगरवाडी ची पाहणी १२ मार्च ला करण्यात आली. सर्वप्रथम सावनेर तालुक्यातील कोछि येथील नवनिर्मित धरणातील पाणी कश्यामुळे कन्हान नदीपात्रात आले. याची प्रत्यक्ष पाहणी केली.मात्र नदीवर कोच्ची शिवारात ब्यारेजचे बांधकाम सुरू असून येथील पाटबंधारे विभाग च्या निष्काळजीपणाने ब्यारेज फुटल्याने एकाएक पाणी कन्हान नदीपात्रात गेल्याने डांगरवाड्या वाहून गेल्या. अनेकांचे नुकसान झाले असून या संदर्भात १२ मार्च ला जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांना शिष्टमंडळ भेटून निवेदन सादर करून नुकसाभरपाईची मागणी करणार .
पाहणी करताना मंडळाचे अध्यक्ष ॲड.दादासाहेब वलथरे, उपाध्यक्ष मनोहर भोयर,महासचिव दिलीप मेश्राम, कोमल देवगडे, नामदेव कंनाके, कवडूजी पैठे,अमित पैठे,कल्पना पैठे,प्राची वलथरे, मृणाली वलथरे सह समाजबांधव उपस्थित होते.