नागपूर :- नुकताच झालेला रविवारी 8 ऑक्टोंबर रोजी भाग्यलक्ष्मी हॉल उदय नगर रिंग रोड नागपूर येथे मोठ्या थाटामाटात साजरा झाला. याप्रसंगी प्रफुल्ला गिरडकर कार्यक्रमच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तसेच अध्यक्ष मुकेश रेवतकर होते, विशेष अतिथी मिसेस नागपुर प्रविना दाढे ह्या होत्या. कार्यक्रमांची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक मोरया फाउंडेशन च्या संस्थपिका रजनी चौहाण यांनी केले स्वरधारा या समूहातील अंध गायकांनी स्वागत गीत प्रस्तूत केलें, त्यानंतर दिव्यांग चांदणी कांबळे यांना व अंध गायक मोहम्मद जियाउद्धिन शेख याना मोरया फाउंडेशन चे अध्यक्ष अविनाश चौहाण यांनी मदतनिधी देऊन त्यांचा सत्कार केला. डान्स प्रतियोगिता व नऊवारी लय भारी प्रतीयोगीते साठी ज्युरी म्हणून मराठी अभिनेता अनील पालकर,पूर्णिमा कापता, मनुजा तिवारी, रोहिणी बडवाईक यांनी परीक्षण करून विजेता निवडले.नऊवारी क्वीन 2nd रनर अप 72वर्षाच्या कस्तुरी कोंपले,1st रनर अप नेहा समुद्रे आणि विनर अस्मिता मुदाफले य विजेत्या ठरल्या.किड्स डान्स प्रतियोगिता मधे 5ते 9या वयोगटात द्वितीय नगद पुरस्कार सोनाली गाडीकर हिने तर प्रथम नगद पारितोषिक आशी पौनिकर हिने पटकावले.नृत्याच्या 10 ते 14, या वयोगटात प्रथम नगद पुरस्कार सुशांत जैस्वाल तर द्वितीय नगद पुरस्कार श्रावणी मालेकर ह्यांनी जिंकले. एकल नृत्य स्पर्धेत प्रथम नगद पुरस्कार आस्था वांढरे द्वितीय नगद पुरस्कार प्रिया शिर्के, तृतीय नगद पुरस्कार खुशी महाकाळकर यांना मिळाला. समुह नृत्य मधे प्रथम नगद पुरस्कार किंग्ज आर्ट स्टुडिओ द्वितीय नगद पुरस्कार रेट्रो ग्रुप तर तृतीय पुरस्कार किड्स आर्ट याना मिळाला.मोरया फाऊडेशन च्या या कार्यक्रमात नृत्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले या मधे सोनू नक्षणे, पूजा निनावे, अश्विनी झवर, लावण्या मंगेश वाघमारे जयकिशन इत्यादि. यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कांचन सासंनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रजनी चौहाण यांनी केले कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी माधुरी इत्तडवार,मनीषा भोयर, फाल्गुनी निमजे, सुवर्णा रहाटे, वैशाली नंदांनवार, संध्या जैस्वाल, शिखा समुद्रे इत्यादींचे सहकार्य लाभले.
मोरया फाउंडेशन आयोजित डान्स प्रतियोगिता आणि नऊवारी लई भारी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com