अरोली :- येथून जवळच असलेल्या ग्रामपंचायत खरडा अंतर्गत येत असलेल्या रघुनगर ( खरडा) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान पंचकमिटी देवस्थान व समस्त ग्रामवासी तर्फे माही मासच्या पावन पर्वावर 13 व 14 फेब्रुवारीला थाटात पार पडला.
दहीकाला उत्सवापूर्वी 8 फेब्रुवारी शनिवार ते 12 फेब्रुवारी बुधवार सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत दररोज सुंदर कांड चे आयोजन करण्यात आले होते. 13 फेब्रुवारी गुरुवारला सकाळी 11 वाजता काल्याचे किर्तन, सायंकाळी सात वाजता दहीकाला उत्सव, रात्री नऊ वाजता कलाकार मनोज तांबुलकर, शंकर निमकर ,नरेंद्र तांबुलकर ,महेंद्र तांबुलकर, संघपाल शंभरकर, चेतन शिवणकर, प्रफुल सर्वे ,कुमारी भाग्यश्री, स्मिता, मोनिका, ऑर्गन अजय, तबला जासूद, पॅड मुखरू यांच्या अभिनयाने नटलेले तीन अंकी नाटक भटकलेली पाखरे चे सादरीकरण करण्यात आले. 14 फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता पासून शाहीर माणिक देशमुख साथी व्यंकट ज्ञानेश्वर यांची संपूर्ण पार्टी सह राष्ट्रीय खडा तमाशा चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सभापती स्वप्नील श्रावणकर ,मनोज कोठे,शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे, माजी सरपंच भगवान बावनकुळे , खरडा सरपंचा वैशाली मुरलीधर तांबुलकर, उपसरपंच वसंता भाजीपाले ,सचिव एस एम शंभरकर ,ग्रामपंचायत सदस्यगण विजय कवरे, शुभांगी रोशन येळणे, मंदा धर्मराज भिवगडे, बेबी दीपक कारोंडे ,रूपाली तेजराम उके, तंटामुक्त अध्यक्ष गगन मेहर, पोलीस पाटील शरद भिवगडे, माजी सरपंच अरुण भिवगडे सह गावातील ,परिसरातील सामाजिक व राजकीय पदाधिकारी, पुढारी, मान्यवर उपस्थित होते.
उत्सवाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक शंकर निमकर, भोजराज वैद्य, चेतन शिवणकर, श्री हनुमान पंच कमिटी देवस्थान अध्यक्ष नरेंद्र तांबुलकर, उपाध्यक्ष अरुण वैद्य, सचिव गुणवंता भाजीपाले, कोषाध्यक्ष कमलेश ठाकरे ,सदस्य गण पुरुषोत्तम तांबुलकर, प्रदीप नरुले, चंद्रशेखर समरीत, महेंद्र तांबुलकर, भोजराज निमकर, विकेश बोंबळे ,दिलीप शेंडे,गणेश झलके, रोशन सर्वे, अर्जुन तांबुलकर, कृणाल तांबुलकर, श्रीपत झलके, विनोद तडस, चेतन भोयर, उमाकांत तांबुलकर, विनोद सुने, रवींद्र ढेंगे ,दिनेश बिसेन यांनी परिश्रम घेतले तर समस्त ग्रामवासीयांनी सहकार्य केले.