नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत येत्या बुधवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता ‘फ्रीडम टू वॉक, सायकल अँड रन’ कार्यक्रमाचे आयोजन झिरो माईल मेट्रो स्टेशन येथे करण्यात आलेले आहे. स्मार्ट सिटी मिशन, केन्द्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या निर्देशाप्रमाणे सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.
वातावरणात कॉर्बन उत्सर्जन कमी करणे तसेच नॉन मोटराईज ट्रान्सपोर्टला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमामागील उद्धेश आहे. या कार्यक्रमात शहरातील प्रतिष्ठित नागरिक, जनप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी आपले सक्रिय योगदान नोंदविणार आहेत. फ्रीडम टू वॉक, सायकल अँड रन’ अंतर्गत बुधवारी सकाळी ६.३० वाजता सायक्लोथॉनची सुरुवात झिरो माईल मेट्रो स्टेशन (फ्रीडम पार्क) पासून होणार असून विज्ञान संस्था, आकाशवाणी चौक, तिरपुडे कॉलेज, CSIR – CIMFR, सी पी क्लब, लेडीज क्लब, आकाशवाणी चौक, विज्ञान संस्था मार्गक्रमण करून फ्रीडम पार्कवर परतेल. या अभिनव उपक्रमासाठी मोठ्या संख्येत नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.