पोलीस रायझिंग डे निमित्त कामठी पोलीस स्टेशन येथे सायबर गुन्हे जनजागृती

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– आॅनलाइन फसवणूक टाळण्याबाबत मार्गदर्शन

– सोशल मीडियाच्या विधायक वापराचे आवाहन 

कामठी :- महाराष्ट्र पोलीस रायझिंग डे सप्ताहानिमित्त आज 6 जानेवारीला कामठी पोलीस स्टेशन येथे डीसीपी निकेतन कदम यांच्या मुख्य उपस्थितीत .

विद्यार्थी, विद्याथिनी तसेच शिक्षकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यात आली.

  याप्रसंगी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, बँकिंग फ्रॉड व इतर मुद्द्यावर मार्गदर्शन केले. बँक आपल्या खातेदारांना खाते व एटीएम संबंधित माहिती विचारत नाही, ती कोणलाही देऊ नका. याप्रकारचे कॉल आल्यास तत्काळ बँक शाखेशी नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. मोबाईलवर येणारे बँक मेसेज काळजीपूर्व वाचा. मोबाईल नंबरवर येणारे ओटीपी पासवर्ड असतो. तो कुणालाही देऊ नका. एटीएममधून पैसे काढताना पासवर्ड टाकताना कुणालाही दिसणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. यासंदर्भात, उपस्थितांंशी संवाद साधताना डीसीपी कदम यांनी आपली फसवणूक होऊ नये म्हणून डेबिट किंवा क्रेडिट कार्ड स्वत: स्वाइप करा, बँक कार्डचा पासवर्ड गोपनीय ठेवा, पासवर्ड कुणाला सांगू नका, पासवर्ड वारंवार बदला. एटीएममधून पैसे निघत नसल्यास बँकेशी संपर्क साधावा. सोशल नेटवर्किंग साइटवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नका. त्यांच्याशी कोणतीही व्यक्तिगत माहिती अथवा फोटोची देवाणघेवण करू नका. माहिती अथवा फोटो शेअर करताना पूर्ण विचार करा. सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून दाखविलेल्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या कोणत्याही एसएमएस, व्हॉट्सअप मेसेजला उत्तर देऊ नका. मोबाइलवर अथवा मेलवर लॉटरी लागली आहे, अथवा तुमचा मोबाइल नंबर लकी विनर आहे, असे सांगून खोटे फोन कॉल किंवा मेसेज येऊ शकतात. अशा फोन कॉल व मेसेजला बळी न पडता अज्ञात बँक खात्यात पैसे जमा करू नका, असे सांगितले. 

ई – मेलच्या माध्यमातून कंपनीत नोकरी लागलेली असल्याचे सांगून आॅफर लेटर दिले जाते. या प्रक्रियेमध्ये कागद पडताळणी फी, बाँड फी, सिक्युरिटी डिपॉझिट या वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपीच्या बँक खात्यामध्ये पैसे भरण्यास भाग पाडले जाते. अशा प्रकारच्या कॉल्सना बळी पडू नका, असेही त्यांनी सांगितले. मोबाईल फोनवर अथवा संगणकावर फेसबुक अकाउंट सुरू करताना युजर आयडी व पासवर्ड कोणालाही दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. मित्र अथवा मैत्रिणींना आपले फेसबुक वापरण्यास देऊ नका, पासवर्ड शेअर करू नका. दुसर्याचे फेक फेसबुक अकाउंट काढणे हा माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावतील असा मजकूर, फोटो पोस्ट करणे, फॉरवर्ड करणे, कमेंट करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आपले फोटो, पासवर्ड, फोन नंबर आणि कुटुंबाची माहीती आदी सोशल मीडियावर शेअर करू नका. सोशल मीडियावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीला प्रत्यक्षात एकटे भेटू नका. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, भडकावू संदेश पाठवू नका आणि अश्लील चित्रफीत व चित्रे पाठवू नका. हा कायद्याने गुन्हा आहे, असे सांगितले.

तसेच विद्यार्थिनींना शस्त्र ओळख व हताळणीचे मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमात विद्यार्थिनींना रायफलची कार्यपद्धती आणि ओळख व्हावी, म्हणून ४ शस्त्रे दाखवण्यात आली.मुलींना शस्त्रे कशी पकडायची, अचूक निशाणा साधण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची आणि हातांच्या विशिष्ट हालचालींवर बारीक नजर कशी ठेवावी, याचे प्रात्यक्षिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी करून दाखवले.तसेच पोलिसांची तात्काळ कुठलीही मदत लागल्यास डायल 112 वर कॉल करावे असे सांगण्यात आले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी सांगितले की ‘सायबर क्राईम हा सध्याचा ज्वलंत विषय असून त्याबाबत सावधगिरी बाळगा व आपली फसवणूक आपणच टाळा. सोशल मीडियाचा वापर मर्यादित व सुरक्षितपणे करण्यासाठी योग्य ती काळजी घ्या. इंटरनेटवरून वस्तू खरेदी करताना साईटची विश्वासार्हता तपासून मगच पेमेंट करा. आपला प्रोफाइल व त्याअनुषंगाने येणारी वैयक्तिक माहिती, आपला फोटो याबाबत सावधगिरी बाळगा. आपला मोबाईल नंबर, आधार कार्ड, त्याचा पिन नंबर इतरांना सांगू नका.

कार्यक्रमाला विविध शाळेतील विद्यार्थिवर्ग व शिक्षक गण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एपीआय भातकुले यांनी केले तर आभार प्रदर्शन गुप्त विभागाचे अखिलेश ठाकूर यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युथ क्लब एवं पँथर क्लब के मध्य आज फाइनल

Sat Jan 6 , 2024
– स्वतंत्रा सेनानी स्व. पंडित त्रियोगी नारायाण (जुग्गा महाराज) स्मृति,सिनियर मार्निग हॉकी ग्रुप 7 ए साईड हॉकी प्रतियोगिता  राजनांदगांव :- छत्तीसगढ़ हॉकी एवं जिला हॉकी संघ राजनांदगाँव के तत्वाधान मे सीनियर मॉर्निग हॉकी ग्रुप के द्वारा आयोजित सीनियर मॉर्निंग ग्रुप 7 ए साइड हॉकी प्रतियोगिता के तहत चौथे दिन का पहला सेमिफाइनल मैच युथ क्लब विरुद्ध शहीद राधे मोतीपुर के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com