बृहन्मुंबई शहरात 8 एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

मुंबई :- बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई शहरात 8 एप्रिल 2023 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, सांगितीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ आणि विवाहप्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अत्यंविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या वैधानिक बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सहकारी संस्था तसेच अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून होणारे कार्यक्रम यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास या जमावबंदी आदेशातून वगळण्यात आले आहे, असे आदेश पोलीस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी काढले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्‌घाटन

Mon Apr 3 , 2023
नागपूर :- संपूर्ण देशभरातील पत्रकारांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या आणि सकारात्मक पत्रकारितेची बिजे रोवणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्‌घाटन महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांच्या हस्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. हेमंत सोनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे होते. राष्ट्रीय कार्यकारिणी सचिव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com