खासदार महोत्सवातून विदर्भाचे सांस्कृतिक वैभव वाढेल – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महोत्सवास उपस्थिती

नागपूर :- अनेक कलागुण संपन्न वैदर्भीय आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सवातून नवीन पीढीला व्यासपीठ मिळत आहे. या सांस्कृतिक मंचातून विदर्भाचे सांस्कृतिक वैभव वाढेल, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

नागपूर खासदार सांस्कृतिक महोत्सवास आज उपमुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, नागपूर व जिल्ह्यातील विविध आमदार, नागपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागपूर आणि विदर्भातील जनतेच्यावतीने खासदार सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. खासदार सांस्कृतिक महोत्सव सुरू करून एक अत्यंत चांगले व्यासपीठ कलावंतांना उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि रसिकांनाही सांस्कृतिक आनंद घेण्यासाठी एक चांगली पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

देशातले आणि जगातले नावाजलेले कलाकार खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या मंचावर येत असतात आणि आपली कला सादर करीत असतात. सर्व कलाकारांना नागपूरकर प्रोत्साहन देत असल्याचे आपण अनुभवत आहोत. त्यांच्यासोबत स्थानिक कलाकारांनाही एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उद्यापासून सर्व मार्गांवर धावणार माझी मेट्रो पहिला टप्पा पूर्ण, लोकार्पणास सज्ज 

Sat Dec 10 , 2022
नागपूर :- महा मेट्रोने बांधलेल्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उर्वरित काम पूर्ण झाल्याने रविवार, ११ डिसेंबरपासून चारही दिशांना मेट्रो गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. महा मेट्रोच्या ऑरेंज मार्गावरील कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक आणि ऍक्वा मार्गिकेवरील सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर या मार्गावरील प्रवाशांसाठी मेट्रो रेल्वे सेवेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून ऑटोमोटिव्ह चौक ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com