गुरूवारपासून कोव्हिशिल्डचे १५ केंद्रांवर लसीकरण पात्र व्यक्तींनी बुस्टर आणि दुसरा डोससाठी पुढे येण्याचे आवाहन

नागपूर : कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला ९००० डोस प्राप्त झाले आहेत. कोव्हिशिल्डच्या लसीकरणासाठी मनपाच्या दहाही झोनमधील १५ केंद्रांवर गुरूवार १९ जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे. अद्यावही कोव्हिड प्रतिबंधात्मक कोव्हिशिल्ड लसीकरणाचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस न घेतलेल्या व्यक्तींनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाउन लसीकरण करून घेण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.

कोरोना संसर्गापासून बचावाचे मोठे अस्त्र कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे नागपूर शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी लसीकरणाचे अभियान चालविण्यात आले होते. त्याचेच फलीत म्हणजे शहरात पात्र व्यक्तींच्या संख्येपेक्षा अधिक जणांचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. दुस-या डोससाठी काही नागरिकांचे लसीकरण अद्यापही बाकी आहे. याशिवाय दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येतो. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे लसीकरण करण्यात आले आहे.

केंद्र आणि राज्य शासनाकडून झालेल्या लस पुरवठ्यानुसार शहरात लसीकरण अभियान चालविण्यात आले आहे. शहरात कुणीही लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी पुन्हा एकदा मनपाद्वारे कोव्हिशिल्ड लसीच्या लसीकरणाला उद्या गुरूवारपासून सुरूवात करण्यात येत आहे. झोननिहाय मनपाच्या विविध केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात येत असून लसीकरणापासून अद्याप वंचित असलेल्यांनी त्वरीत आपले लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 102 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Thu Jan 19 , 2023
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (18) रोजी शोध पथकाने 102 प्रकरणांची नोंद करून 44900 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com