नागपूर :- विश्व योग दिन २१ जून रोजी संपूर्ण विश्वात साजरा करण्यात येणार आहे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि नागरिक, विद्यार्थी यांनी योग करणे सुरू करावे या उद्देशाने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरच्या वतीने विश्व योग दिनाच्या काऊंटडाउन दिन शेष कार्यक्रमाचे आयोजन नागपुरातील केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नविन सचिवालय भवन सिव्हिल लाईन नागपूर येथे आज सकाळी ०९.०० वाजता करण्यात आलेले होते.
यावेळेला योग प्रशिक्षकानी यांनी उपस्थितां कडून विविध प्रकारची आसने, योग क्रिया आदी करवून घेण्यात आल्या. या प्रसंगी पत्र सूचना कार्यालयाचे उप संचालक, शशिन राय, केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर तसेच पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय भूजल बोर्ड कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.