मनपाच्या पथकाने केली शहरातील पतंग विक्रीच्या दुकानात तपासणी; नायलॉन मांजाला हद्दपार करण्यासाठी कठोर पावले

चंद्रपूर : प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी करण्यास  मनपाने पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 अन्वये प्रतिबंध केले आहे. नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी झोननिहाय ३ पथक गठीत करण्यात आले असून, यात मनापासोबत पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या पथकाने आज दिनांक 28 डिसेंबर रोजी शहरातील विविध पतंग विक्रीच्या दुकानात भेटी देऊन तपासणी केली.
 
नायलॉन मांजाला पूर्णतः हद्दपार करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पावले उचलली असून, विक्री केल्यास १० हजारांचा दंड, तर साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई कारवाई करण्यात येणार आहे.
 
नायलॉन मांजामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयातीवर पूर्णपणे बंदी आणली आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने गठीत पथकाने शहरातील विविध भागात असलेल्या पतंग विक्रीच्या दुकानात भेटी देऊन तपासणी केली. शिवाय नायलॉन मांजा विकू नये, असे सुद्धा सुचित करण्यात आले.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

&TV stars share memorable moments from 2021 and their 2022 resolution

Wed Dec 29 , 2021
Mumbai – The new year is when we look back and reflect upon the whole year, what new we have experienced, what great we have achieved and what more to explore. With 2022 is just around the corner, &TV stars Siddharth Arora (Mahadev, Baal Shiv), Shrenu Parikh (Genda Agarwal, GharEk Mandir-Kripa Agrasen Maharaja Ki), Ambrish Bobby (Ramesh Prasad Mishra, Aur […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com