मनपाचे सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस सेवानिवृत्त

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. जनसंपर्क विभागाच्या एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला.

            याप्रसंगी मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, माजी जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, विभागाचे सहायक राजेश वासनिक, प्रदीप खर्डेनवीस यांच्या पत्नी रागिणी खर्डेनवीस, त्यांचे मुले प्रतिक प्रदीप खर्डेनवीस, रोहन प्रदीप खर्डेनवीस, विभागाचे माजी सहायक दिलीप तांदळे, श्री. भारद्वाज, नंदू बोरटकर, उमेश पवार आदी उपस्थित होते.

            उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह अन्य मान्यवरांनी प्रदीप खर्डेनवीस यांना तुळशीरोप, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, मनपाचा मानाचा दुपट्टा आणि भेटवस्तू देउन त्यांचा सपत्नीक सत्कार केला. विनम्रता आणि शालीनता हा स्वभावगुण जपून प्रामाणिकपणे सेवाकार्य बजावल्याबद्दल उपायुक्त निर्भय जैन यांनी प्रदीप खर्डेनवीस यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सहायक आयुक्त महेश धामेचा यांनीही प्रदीप खर्डेनवीस यांच्या कार्यकाळाची प्रसंशा केली. वेळोवेळी सोपविलेली कामे विहित वेळेत पूर्ण करून ते मार्गी लावण्यात त्यांचा हातखंडा असल्याचेही ते म्हणाले. जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी प्रदीप खर्डेनवीस यांच्यासोबतच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यातील कामाप्रती समर्पणवृत्ती, संयम यातून शासकीय सेवेत कार्यप्रणाली कशी असावी याची प्रचिती प्रदीप खर्डेनवीस यांच्या कार्यकाळात आल्याचे ते म्हणाले.

            प्रदीप खर्डेनवीस यांची नागपूर महानगरपालिकेत बाजार विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून ३ सप्टेंबर १९८४ रोजी नियुक्त झाली होती. त्यानंतर १९९२ मध्ये त्यांची सामान्य प्रशासन विभागात बदली झाली. १९९७मध्ये परत बाजार विभागात पदोन्नती होऊन उच्च श्रेणी लिपिक म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर ३१मे २००६ मध्ये समिती विभागात बदली झाली. तसेच २५ ऑक्टोबर २०१३ वित्त विभागात पदोन्नती मिळाली आणि १६ ऑक्टोबर २००७पासून सहायक जनसंपर्क पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. २७ जुलै २०२१ मध्ये त्यांना सहायक अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली.  प्रदीप खर्डेनवीस यांनी जनसंपर्क विभागात १४ वर्षे  सेवा दिली आणि ३० डिसेंबर २०२१ रोजी ते सेवानिवृत्त झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मनपा क्षेत्रातील १ ली ते ७ वी चे वर्ग सुरु करण्यास १० डिसेंबर पर्यंत स्थगिती

Wed Dec 1 , 2021
नागपूर :  कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील इयत्ता १ली ते ७वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास १० डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे. कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन १० डिसेंबर नंतर याबाबत पुढील आदेश निर्गमित करण्यात येईल.मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (ता. ३०) यासंबधीचे आदेश जारी केले आहे. मात्र मनपा क्षेत्रातील  इयत्ता ८ वी ते १२ वी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com