राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक , सूचना व हरकती नोंदवाव्यात

नागपूर : अजूनही ज्यांचे नाव मतदार यादीत नाही किंवा ज्यांना मतदार संघातील ठिकाण बदलावयाचे आहे. त्यासोबत युवक युवतींना मतदान यादीत नाव नोंदणी करावयाची आहे. अशा सर्व नागरिकांसाठी 5 डिसेंबरपर्यंत सुवर्ण संधी उपलब्ध आहे, नवमतदार होण्यासाठी अवश्य या संधीचा लाभ घ्या, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.

राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधींनी   आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या कार्यास सहकार्य करावे. मतदार यादीत वेळेवर नाव नसल्यास होणाऱ्या अडचणीला सामोरे जाण्यापेक्षा आताच मतदार यादीत नाव नोंदणी करा.   मतदारांचे नाव मतदार यादीत नसल्यास तात्काळ नाव नोंदणी करुन घ्यावी. तसेच इतरांना नाव नोंदणी करण्यास प्रोत्साहित करावे. छायाचित्र अथवा ठिकाण बदल व स्थनांतरामुळे ज्याचे नाव मतदार यादीतून वगळले असतील, त्यांनी त्वरीत निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहीमेंतर्गत नवीन मतदार नोंदणी करणे, यादीतून नांवे वगळणे आदीसांठी  मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत होती, त्यास 5 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  या कालावधीत दावे  हरकती स्वीकारणेत येतील.

नागरिकांनी,  लोकप्रतिनिधींनी  मतदानाच्या वेळी आपली नावे नसल्याबाबत नाराजी व्यक्त करणे रास्त आहे, मात्र अशा अभियानात सहभागी होणे देखील राष्ट्रीय कर्तव्य आहे त्यामुळे या देशाचे सजग नागरिक म्हणून या अभियानात प्रत्येकाने सहभागी व्हावे. सुशिक्षित युवकांनी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला मतदार झाले अथवा नाही याबाबत विचारणा करून प्रशासनासोबत काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

        30 नोव्हेंबर 2021 पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे मतदार फॉर्म क्रमांक सहा भरून नवीन नावे पुन्हा दाखल करू शकतात. फॉर्म नंबर 7 भरून यातील मयत, स्थानांतरित यांची नावे मतदार यादीतून वगळून शकतात. तसेच फॉर्म नंबर 8 भरून मतदार यादीतील लिंग, नाव, वय याबाबतच्या चुका दुरुस्त देखील होऊ शकतात. तसेच फॉर्म क्रमांक आठ अ भरून त्याच मतदारसंघातील एका भागातून दुसर्‍या भागामध्ये नावे स्थलांतरित केल्या जाऊ शकतात. तसेच एनव्हीएसपी डॉट इन या वेबसाईटवर मतदार ऑनलाईन देखील हे सर्व प्रकारचे फॉर्म भरू शकतात. भारत निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाइन नावाचे मोबाईल ॲप तयार केलेले आहे. सदर ॲप डाऊनलोड करून त्यावरूनही  सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरता येतात. तरी सर्व मतदार व नागरिकांनी व सर्व इच्छुक उमेदवारांनी सदर यादी तपासून आपल्या हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

अखेर बसस्थानक चौकातील ते अपघातग्रस्त वर्तुळाकार  रस्ता दुभाजक  हटविले

Thu Dec 2 , 2021
रामटेकच्या नागरिकांनी अखेर सुटकेचा श्‍वास घेत प्रशासनाचे  मानले आभार…..  रामटेक -रामटेक बसस्थानक चौकातील वर्तुळाकार रस्ते दुभाजक तत्काळ हटविण्याबाबत शिवसेना  काँग्रेस , राष्ट्रवादी, भाजप पदाधिकारी सह    विविध संघटना ने  उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्‍वर यांना निवेदन देण्यात आले होते.अनेक दिवसापासून निवेदने देणे आंदोलने करणे सतत सुरूच होते…. अखेर शिवसेना पदाधिकारी यांनी देखील निवेदन दिलीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com