महारेरा कायद्यामुळे ग्राहकांना स्वरक्षण  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागूपर :- गृहनिर्माण क्षेत्रातील विकासकांना महारेरा कायद्याअंतर्गत प्रकल्पांची नोंदणी करणे आवश्यक करण्यात आल्यामुळे ग्राहकांना संरक्षण मिळाले आहे,विकासकांनीही सर्वसामान्य जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

चिटणवीस सेंटर येथे ओमेथॉन प्रॉपटी एक्सपो चे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.या वेळी एक्सपोचे अध्यक्ष घनशाम ढोकणे, सचिन मेहेर, राहूल बोंद्रे, कुणाल पढोळे, अजय बोरकर, अजय केसरे, संजय महाजन उपस्थित होते.

एकाच छताखाली बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांनी विविध गृहनिर्णान व भुखंड या बद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी या प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी उपलब्ध झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणालेकी या पूर्वी अनधिक्त भुखंड खेरदीचे प्रकार होत होते पंरतू अधिकृत पणे खरेदी करणे या मुळे सोइचे होणार आहे.अशा प्रकारचे प्रदर्शन दरवर्षी आयोजीत करावे असी सुचना या वेळी त्यांनी दिली.

या एक्सपो मध्ये 65 पेक्षा जास्त बिल्डर व 350 पेक्षा जास्त डेव्हलपर्स यांनी सहभाग घेतला आहे. नागपूर शहरातील नागरिकांना त्यांच्या मागणी प्रमाणे पूर्व प्रकल्पामध्ये नोंदणी करणे सुलभ होणार आहे.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओमेथॉन 2 या प्रॉपटी एक्सपोतील विविध दालनांना भेट देऊन विकासकांच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ईव्हीएम म्हणजे 'ईलेक्ट्रानिक वोट मॅनिप्युलेशन'- डॉ.हुलगेश चलवादी

Mon Jan 6 , 2025
– बहुजनांचे राजकीय प्रतिनिधित्व संपवण्याचे षडयंत्र बसपची ‘ईव्हीएम हटाओ’ची घोषणा  पुणे :- पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजनांचे राजकीय अस्तित्व ‘ईव्हीएम’ अर्थात ‘ईलेक्ट्रानिक वोट मॅनिप्युलेशन’ करीत संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. देशातील ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ या विचारधारेला तडा देण्याचे काम तथाकथितांकडून पर्यायाने प्रस्थापित राजकीय पक्षांकडून सुरु असल्याचा दावा बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र प्रभारी,माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी आज,सोमवारी (ता.६) केला. देशातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!