बांधकाम साहित्य आणि मलबा संकलनाचे कार्य मनपातर्फे सुरू

नागपूर : नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी शहरात दररोज निर्माण होणारा बांधकाम आणि बांधकाम तोडीचा कचरा अर्थात मलबा गोळा करण्याचे काम नागपूर महानगरपालिकेतर्फे नुकतेच सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानात मोठी भर पडणार आहे.

मनपातर्फे या कामासाठी ए.जी. एन्व्हायरो इंजिनियर लिमिटेड अंतर्गत कार्यरत हैद्राबाद सी.अँड डी. वेस्ट प्रा. कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीतर्फे नागपूर महानगरपालिका हद्दीतील बांधकाम व मलब्यावर पुनर्वापर प्रक्रिया करण्यात येणार आहे. मनपाद्वारे नियुक्त ऑपरेटर्सनी सर्वप्रथम शहरातील सर्व भागाचे सर्वेक्षण केले आणि लक्ष्मीनगर झोनपासून बांधकाम आणि मलबा गोळा करणे सुरु केल्याचे मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी आणि उपद्रव शोध पथकाचे जवान उपस्थित होते.

सदर कंपनीला प्रक्रिया युनिट तयार करण्यासाठी मनपातर्फे भांडेवाडी येथे ५ एकर देण्यात आलेली जमीनवर निर्माणकार्य डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. कंपनी प्रतिदिवस जवळपास २०० टन सी.अँड डी. कचऱ्यावर पुनर्वापराची प्रक्रिया करणार आहे. यातून बांधकामाला लागणारे साहित्य जसे, रेती, विटा, पेव्हरब्लॉक, टाईल्स बनविण्यात येणार आहे. सी.अँड डी. कचरा शहरातून गोळा करण्यासाठी संपूर्ण पायाभूत सुविधांची व्यवस्था कंपनी करणार आहे.
या प्रकल्पामुळे शहरात रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांवर, निवासी भागातील सी. अँड डी. कचरा पूर्णपणे कमी होईल. यामुळे नागपूर शहर अधिक स्मार्ट आणि स्वच्छ होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता (पर्यावरण) यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

‘कोव्हिड बेड’ ॲप तयार करण्याकरीता नागपूर स्मार्ट सिटीला राष्ट्रीय पुरस्कार

Sat Sep 3 , 2022
मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी स्वीकारला पुरस्कार नागपूर  : कोरोना महामारीच्या दरम्यान कोव्हिड बेडच्या संदर्भात अध्याभूत माहिती देणारे ‘कोव्हिड बेड’ अँप्लिकेशन तयार करून नागरिकांच्या सेवेत रुजू केल्याबद्दल स्मार्ट सिटीस कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे आयोजित कार्यक्रमात मुंबई येथे नागपूर स्मार्ट सिटीला राष्ट्रीय स्तराचे पुरस्कार देण्यात आले. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  चिन्मय गोतमारे यांनी स्मार्ट सिटीच्या वतीने पुरस्कार स्वीकारले. स्मार्ट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!