बार्टीमार्फत संविधान दिवसानिमित्त संविधान रॅली 

– सवलतीच्या दरात पुस्तक विक्री

नागपूर :- भारतीय संविधान दिन अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी सकाळी 8 वाजता समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था प्रादेशिक कार्यालय नागपूर सह समाजिक न्याय भवन विभागाच्या अधिनस्त असणारे महामंडळ, दीव्यांग शाळेचे विद्यार्थी, शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी, सफाई कर्मचारी शाळेतील विद्यार्थी, समाजकार्य महाविद्यालयतील विद्यार्थी व कर्मचारी यांच्या सहभागाने संविधान रॅलीचे आयोजन केले आहे.

भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो. जनसमुदायांमध्ये संविधानात समाविष्ट असणारी हक्क आणि कर्तव्य यांचे जगजागृती करुन संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरीता, तसेच संविधानाबाबत जनमाणसात जाणीव-जागृती व्हावी याकरीता संविधान रॅलीचे आयोजन करण्यात येते.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर संविधान रॅलीस संबोधीत करणार आहे. याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशनी तेलगोटे, बार्टीचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके उपस्थित राहणार आहे. रॅलीत सामाजिक न्याय विभागा अंतर्गत येणारे विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांचा सहभाग राहणार आहे. सोबत करीअर कॅम्पस, पिरॅमिड अकॅडमी, विलास अकॅडमी या प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक आणि विद्यार्थी यांचाही सहभाग असणार आहे.

रॅलीची प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नागपूर येथून होणार आहे. रॅलीचा समारोप संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करुन होणार आहे.

संविधान दिनानिमित्त संविधान चौकात बार्टी उपकेंद्रा मार्फत सवलतीच्या दरात पुस्तकाचे स्टॉल लावण्यात येणार आहे. संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते प्रमुख स्टॉलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ज्यांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे त्यांनी इतरांना पुस्तक सवलतीचा लाभ घेऊ देण्याचे आवाहन बार्टी उपक्रेंद्रातर्फे करण्य़ात आले आहे. रॅलीमध्ये विद्यार्थ्याकडे शासन निर्णयात नमूद केल्यानूसार संविधानिक मूल्य, संविधानाची कलमे, लोकशाहीची तत्वे, घोषवाक्य इत्यादी फलक सोबत आणण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. संविधान रॅलीत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन बार्टी उपकेंद्रामार्फत करण्यात आलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Regional Transport Authority Okays Shared Auto Service from Metro Station

Sat Nov 25 , 2023
MAHARASHTRA METRO RAIL CORPORATION LIMITED (Nagpur Metro Rail Project) • *First Launch of Affordable Services Through Shared Auto Rickshaw Soon* NAGPUR :- Maha Metro has taken initiative for the launch of affordable feeder service through shared auto rickshaw from 37 metro stations. Maha metro has send the proposal to RTO with the detail survey of the adjoining area to each […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com