संदीप बलवीर, प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा उपक्रम
टाकळघाट :- भारतीय संविधान हे जगातील सर्वांग सुंदर संविधान असून,भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका हि जगातील सर्वोच्च उद्देशपत्रिका आहे. कारण भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेची सुरुवात कुठल्याही देवाच्या किंवा अल्लाहच्या नावाने झाली नसून “आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष,गणराज्य” अशी केली आहे. परंतु भारतीय संविधानात आपल्या देशाचे नाव भारत असतांना हिंदुस्थान असे म्हणून संविधानाचा अपमान करणारे देशात जात व धर्माच्या नावाने राजकारण करत असतात. जनतेला विविध धर्म व धर्मग्रंथात गुंतवून सार्वभौम राष्ट्राच्या संकल्पनेला खिंडार पाडणारे हे का सांगत नाही की,संविधान हे भारतीयांचा पवित्र ग्रंथ आहे असे प्रतिपादन टाकळघाट येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रा. रामटेके यांनी व्यक्त केले.
बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व महाप्रज्ञा बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक चौकात सोमवार दि २८ नोव्हे ला संविधान दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मचारी प्रशिल,प्रमुख अथीती म्हणून पुरोगामी विचारवंत सुधीर सोमकुंवर,नागपूर जी प विरोधी पक्षनेता आतिष उमरे, माजी जी प सदस्य हरीचंद्र अवचट,ग्रा प सदस्य मनोज जीवने, पोलीस निरीक्षक अशोक कोळी हे होते. तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. रामटेके हे होते. तर विशेष अथीती म्हणून हिंगणा प स सभापती सुषमा कडू ,ग्रा प सरपंचा शारदा शिंगारे,उपसरपंच नरेश नरड, चंद्राबाबू ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी गावातील उच्च शिक्षण घेऊन वैदयकीय क्षेत्रात चिकित्सक बनलेल्या डॉ. क्रीष्णा म्रीनल बिश्वास,दंत चिकित्सक डॉ. प्राजक्ता राजू भगत, डॉ. ईश्वरी बंडू गुजरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणातून प्रशिल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मिती कशी केली व त्याकरिता लागलेला कालावधी व संसदीय लोकशाही चे महत्व सांगितले.पुढे बोलताना रामटेके यांनी सांगितले की,आम्हाला गोळ्याची किंवा शास्त्राची लढाई लढायची नसून विचारांची लढाई लढायची आहे. म्हणून घराणेशाहीचा निषेध करत बौद्धिक पातळीचा विचार करून राज्याला मतपेटीतून बॅलेट पेपर च्या साहाय्याने निवडून आणा व देशात बीजेपी सरकारला धूळ चारा असे कळकळीचे आव्हान केले. चिमनकर ग्रुपचा भीम गर्जना हा बुद्ध भीम गीतांचा जलसा कार्यक्रम सादर केला. पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून त्यानंतर चंद्रकांत गायकवाड यांनी सामूहिक संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले.कार्यक्रमाचे संचालन देव बागडे,प्रास्ताविक सागर चारभे तर आभार आतिष उमरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आयुष् कारमोरे, विशाल गोडघाटे, परिवर्तन सूर्यवंशी, राकेश भगत,मंगेश चंदनखेडे,बंटी भगत,पवन सूर्यवंशी आदिने परिश्रम घेतले.कार्यक्रमाला परिसराती हजारो महिला पुरुष हजर होते.