संविधान दिनानिमित्त पूर्व नागपुरात बाबासाहेबांना अभिवादन व प्रास्ताविका वाचन

नागपूर : संविधान दिनानिमित्त शुक्रवारी २६ नोव्हेंबर रोजी पूर्व नागपूर अंतर्गत सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याला आमदार कृष्णा खोपडे यांनी अभिवादन केले. यावेळी भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम, मंडळ अध्यक्ष संजय अवचट, शहर संपर्क प्रमुख प्रमोद पेंडके, प्रसिद्धी प्रमुख चंदन गोस्वामी, अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष बाळाभाऊ वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी महेंद्र राउत, नगरसेवक प्रदीप पोहाणे, नगरसेविका कांता रारोकर, नगरसेवक अनिल गेंडरे, जे.पी. शर्मा, इंद्रजीत वासनिक, अविनाश ठोसर, प्रवीण कामडे, अंकुश हुमने, कपील मेश्राम, निरंजन दहिवले, नामदेव ठाकरे, विनोद बागडे, मनोज अग्रवाल, मोनू सातपुते, विशाल कोल्हापुरे, आशिष मरजीवे, बाल्या रारोकर, नरेश जुमानी, व्यास जी, दिनेश पटेल, बालू लाकडे, ललित आमगे, रवी चवरे, धोसेवान गुरुजी, आशीष कनोजेग आदिंनी बाबासाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून संविधानाच्या घोषणा देत बाबासाहेबांना वंदन केले.

दिनेश दमाहे
9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

महेशनगर येथे आरोग्य तपासणी आणि लसीकरण शिबीरात शेकडो नागरिकांचा सहभाग

Sat Nov 27 , 2021
चंद्रपूर : शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चंद्रपूर शहर महानरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर होत आहेत. हनुमान मंदिर, महेशनगर येथे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र ७च्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी आयोजित आरोग्य तपासणी आणि लसीकरण शिबीरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.   या शिबिराचे उदघाटन नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका माया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com