संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- समाजकार्य महाविद्यालय कामठीद्वारे मोठ्या उत्साहात संविधान दिवस समारोह साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान गौरव रॅली, संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन व मार्गदर्शन कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ९.०० वाजता संविधान गौरव रॅली काढण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली समाजकार्य महाविद्यालय कामठी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन – ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसर – दादासाहेब कुंभारे कॉलनी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र – समाजकार्य महाविद्यालय, कामठी अशा मार्गाने काढण्यात आली. रॅलीमध्ये बीएसडब्ल्यू-एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. ‘संविधान दिन चिरायू होवो’, ‘भारतीय संविधान के रचनाकार बाबासाहेब की जयजयकार’, ‘सविधान मे रखो आस्था मत चुनो गलत रास्ता’, ‘संविधान भारत की जान है भारतीयो के अधिकारों की पहचान है’, ‘नही मानता मै हिन्दू और मुसलमान मै तो मानता हू सिर्फ भारतीय संविधान, ‘भारत भाग्यविधाता हमारा संविधान है देश का सबसे बडा सन्मान है’, ‘अपने अधिकार संविधान को पहचान संविधानाने दिला मान स्त्री-पुरुष एकसमान’, ‘लोकशाहीचे देते भान भारतीय संविधान’, ‘बाबासाहेबांचे योगदान भारताचे संविधान’ ‘संविधान देते समानपण एक व्यक्ती एक मत’, अशा प्रकारे घोषवाक्यांच्या गजरात संविधान रॅली काढण्यात आली. यानंतर समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या सभागृहात संविधान दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी होत्या. याप्रसंगी कार्यक्रम समन्वयक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम तसेच सहसमन्वयक डॉ. सविता चिवंडे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यानंतर डॉ. रुबीना अन्सारी यांनी विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या भाषणातून संविधान दिनाचे महत्त्व पटवून सांगितले. या प्रसंगी प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ. मनोज होले, डॉ. निशांत माटे, प्रा.शशिकांत डांगे, डॉ. मनीष मुडे, प्रा.राम बुटके, प्रा. आवेशखरणी शेख, कार्यालयीन अधीक्षक प्रफुल बागडे, उज्वला मेश्राम, गजानन कारमोरे, प्रतीक कोकोडे,किरण गजभिये, वसंता तांबडे, नीरज वालदे, शशील बोरकर, राहुल पाटील सहभागी झाले होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी नरेश बोरकर, राहुल सोमकुवर, सदानंद सोमकुवर, अंकित पाली, सागर भोंडेकर, नीतू तिवारी, आरती मेश्राम, कविता लायबर, साक्षी मेटे, उज्ज्वला मानकर, सारिका तुमसरे, प्राजक्ता मेश्राम, आरती मेश्राम, ऐश्वर्या शेंडे, सोनाली गजभिये, प्रज्ञा वर्षेकर, फिजा तरन्नुम, सेजल वडे, तेजल बावनकुळे, आरती गोरले, प्रीती मेश्राम, दीपाली सयाम या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी अथक परिश्रम घेतले.