संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील कापसी (बु) ,कापसी (खु), महालगाव ,आसोली ,गुंमथाळा ,भोवरी ,कडोली ,दिघोरी , नेरी,गादा, लिहीगाव ,सावळी परिसरातील बिना पर्वांना अवैध्य कोळसा डम्पिंग यार्ड धारकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वात यांना निवेदन दिले जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,कामठी तालुक्यातील कापसी (बु) कापसी (खु) ,महालगाव ,आसोली, गुंमथाळा, भोवरी, कडोली ,दिघोरी ,नेरी ,गादा, लिहीगाव, सावळी परिसरात बिना पर्वांना अवैधरीत्या कोळसा डम्पिंग यार्ड टाल धारकाने ग्रामपंचायत, प्रदूषण नियंत्रण मंडळ व कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न देता कोळसा डम्पिंग यार्ड सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला असून वरील गावातील परिसरात नेहमी साथीच्या रोगाची लागन झाली असते त्यामुळे नागरिक साथीच्या रोगामुळे त्रस्त आहे, सोबतच अवैध कोळसा टाळ मुळे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे या परिसरात सुरू झाले आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोळसा व इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असल्यामुळे ग्रामीण भागातील डांबर रोड फुटून ठिकठिकाणी मोठे खड्डे खड्डे पडले असल्यामुळे ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत अपघातात अनेकांना प्राण सुद्धा गमवावे लागले आहेत, अनेकांना अपंगत्व सुद्धा प्राप्त झाले आहे त्यामुळे त्यांचे परिवार उघड्यावर पडले आहेत विनापरवाना अवैधरीत्या सुरू असलेले कोळसा डम्पिंग यार्ड टाल शासनाच्या वतीने त्वरित योग्य चौकशी करून कारवाई न केल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर यांना निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, कृषी सभापती तापे, वैद्य, जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख ,युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महासचिव अनुराग भोयर ,कापसी (खु) सरपंच सुरज पाटील ,उपसरपंच अक्षय रामटेके, रुपेश शेंद्रे ,आकाश बाराहाते ,अमोल निधान ,विशाल शेंद्रे उपस्थित होते