– राज्याच्या भल्यासाठी अशोक चव्हाणांनी महायुती कास धरावी
मुंबई/नागपुर :- गेल्या शेकडो वर्षांपासून देशातील जनतेला समविचारी पक्षाचे हितचिंतक असल्याचे ढोंग करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे आवाहन आता संपुष्टात येत आहे. गेल्या दहा वर्षात देशातील विविध राज्यातील मोठे नेत्यांसह पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्त्यांना पक्षाचे देशाच्या विरोधातील चुकीचे धोरण हे स्पष्टपणे दिसून येत असल्यानेच ते दुखावल्यानंतर सोडचिठ्ठी देत आहे. आज जन्मापासून कॉंग्रेसशी प्रामाणिक राहिलेले माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा देत आपली स्वाभिमानीपणा दाखवून दिला आहे. योग्य वेळी चांगला निर्णय घेणाऱ्या अशोक चव्हाणांनी पुढील राजकीय वाटचाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या नेतृत्वातील महायुतीसोबत करावी असा सल्ला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी दिला.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, महाराष्ट्रात महायुतीचे सरकारचे विकासांच्या कामांना जनतेने स्वीकारले आहे. तसेच पंतप्रधान मोंदीनी प्रगतीशिल भारताला सुजलाम सुफलाम करण्यासाठी घेतलेले धाडसी निर्णय आणि विकास कामे ऐतिहासिक आहेत. लोकसभा निवडणूकापूर्वीच कॉंग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात पूर्णपणे भुईसपाट होणार आहे. राहुल गांधींच्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत होणारी दुय्यम वागणूकीतून अनेक जणांची घूसमट हे आता स्पष्टपणे उघड होत आहे. एकेकाळी मोठा पक्ष समजल्या जाणाऱ्या कॉंग्रेसने अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षांना संपविण्याचे काम केले. आता त्यांचा पक्ष हा महाराष्ट्रात शेटच्या घटका मोजत आहे. येणारा काळात समविचारांचा ढोंग करणारी कॉंग्रेस आता पूर्णपणे संपणार असेही पीपल्स रिपब्लिकन पार्टी निषेध करीत असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.