संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-अंगणवाडी सेविकेच्या सुरू असलेल्या आंदोलनाला कांग्रेसतर्फे किशोर गजभिये यांचे समर्थन
कामठी :- अंगणवाडी सेविकांना कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, तोपर्यंत किमान वेतन 26 हजार रुपये देण्यात यावे, अंगणवाडी महिलांना माणधनाचे निम्मे पेन्शन तथा ग्रॅच्युटी देण्यात यावी या प्रमुख मागणिला घेऊन शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 4 डिसेंबर पासून कामठी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसानी बेमुद्दत आंदोलन पुकारले आहे .कामठी शहरातील अंगणवाडी सेविका रणाळा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग कामठी कार्यालय समोर तसेच ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका कामठी पंचायत समिती कार्यालय समोर बेमुद्दत आंदोलन करीत असून..कामठी पंचायत समिती कार्यालय परिसरात सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या बेमुद्दत आंदोलनाला कांग्रेस पक्षाच्या वतीने समर्थन देत कांग्रेस पदाधिकारी किशोर गजभिये यांनी आंदोलन स्थळाला भेट देत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रेरणा देत त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.तसेच मागण्या पूर्ण होईपर्यंत कायमस्वरूपी आंदोलन कायम ठेवण्याचे मार्गदर्शीत केले.
याप्रसंगी कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे, कांग्रेस चे पदाधिकारी प्रमोद खोब्रागडे,राजकुमार गेडाम ,आकाश भोकरे, यासह प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी चे संयोजक राजेश गजभिये, गीतेश सुखदेवें,कोमल लेंढारे,मनोज रंगारी, आदी उपस्थित होते.