संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या खासदार राहुल गांधी यांना मानहानी खटल्यात अडकवून त्यांची खासदारकी रद्द ठरवल्याबद्दल राहूल गांधी यांना खोट्या मानहानी खटल्यात अडकवील्याचा कांग्रेसतर्फे निषेध करीत असल्याचे मत कांग्रेसचे पदाधिकारी व नागपूर जिल्हा परिषद चे माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी व्यक्त केले.
राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत गुजरातच्या एका भाजप नेत्याने गुजरात न्यायालयात बदनामीचा खोटा आरोप करत खटला दाखल केला होता.या प्रकरणात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली या निकालाला राहुल गांधी यांनी गुजरात जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.जिल्हा व सत्र न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवत राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.भाजपा विरोधात बोलणाऱ्यावर खोट्या केसेस करून त्यांची तोंड बंद करण्याची गुजराती स्टाईल देशातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहे.राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे अशी घणाघाती टीका माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद चे महिला व बाल कल्याण सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे,माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी,कांग्रेस कामठी शहर कार्याध्यक्ष आबीद भाई ताजी,माजी नगरसेवक उबेद सईद अफरोज,युवक कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव अनुराग भोयर, निखिल फलके,इर्शाद शेख, नरेंद्र शर्मा, राजकुमार गेडाम,किशोर धांडे, आशिष मेश्राम, राजेश कांबळे,कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे, उपसभापती दिलीप वंजारी, माजी उपसभापती आशिष मललेवार,केम ग्रा प सरपंच अतुल बाळबुधे, भामेवाडा ग्रा प सरपंच अर्जुन राऊत ,आकाश भोकरे ,राशीद अन्सारी,सलामत अली, प्रमोद खोब्रागडे, आदींनी केली आहे.