गडचिरोली :- छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (SARTHI), पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत कुणबी मराठा, मराठा-कुणबी, कुणबी मराठा समाजातील युवती व महिलांकरीता नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण अंतर्गत वुड कार्विंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. २० सप्टेंबर २०२४ ते १७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांची निवड करणेकरीता मुलाखत दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी सदर मुलाखतीसाठी पंचायत समिती हॉल, धानोरा येथे हजर राहावे. अधिक माहिती करीता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडिसी एरीया, कॉम्प्लेक्स, गडचिरोली किंवा संदीप जाने ९६३७५३६०४१ किंवा अनिता नैताम ९८८११४५०१२ यांना संपर्क साधावा असे आवाहन संदीप जाने, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.