– हृदयरोगमुक्त विदर्भ अभियानासाठी 17-18-19 जानेवारीला हृदयरोग मुक्त कार्यशाळे चे आयोजन
कोंढाळी :- हृदयरोग मुक्त विदर्भ अभियान कार्यक्रमाच्या माहितीसाठी संपूर्ण विदर्भातील हृदयरोग मुक्त विदर्भ अभियानाच्या निमित्ताने मार्गदर्शन कार्यशाळा 17-18-19-जानेवारी या कालावधीत माधवबाग येथे हृदयाचे रक्षण करून , हृदय रोगांपासून मुक्तता मिळविण्यासाठी. हृदयरोग मुक्त विदर्भ या अभियानाचे 17 -18-19जानेवारी दरम्यान तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.यावर माधवबाग रुग्णालयामार्फत शस्त्रक्रियेशिवाय हृदयविकारापासून मुक्ती मिळावी या मोहिमेचा एक भाग म्हणून माधवबाग रुग्णालयाचे सीएमडी डॉ.रोहित माधव साने यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक नागरिकाने विदर्भातील हृदयरोग मुक्त अभियानांतर्गत जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे.तसेच नागरिकांनी आपापल्या गावात हृदयरोग मुक्त विदर्भ अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले. या करिता आयोजित १७-१८-१९- जानेवारी या तीन दिवसीय कार्यशाळेच्या निमित्ताने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार तसेच हृदयरोग विजय दिनानिमित्त डॉ रोहित साने,डॉ.गुरुदत्त अमीन व डॉ.मिलिंद सरदार यांचेकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अशी माहिती माधवबाग कोंढाळ (सलाई) येथील डॉ – आनंद तथा डॉ. राघवेंद्र सिंह यांनी दिली.