संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
-नागरिकांना मिळणार सेवा,17 सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान आयोजन
कामठी ता प्र 17 :- सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज , तक्रारी यांचा निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारीच्या आदेशानव्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ कामठी तालुक्यात आयोजित करण्यात आला असून या सेवा पंधरवाड्यामध्ये विविध विभागाच्या तक्रारीचा निपटारा करून नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ द्यावा अशा सूचना तहसीलदार अक्षय पोयाम यांनी कामठी तहसील कार्यलयात तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजित सेवा पंधरवाडा कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
याप्रसंगी कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर, कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके, गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, सहाययक गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले, आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दिघाडे, नायब तहसिलदार रणजित बमनोटे आदी तहसील, नगर परिषद तसेच पंचायत समिती चे अधिकारी कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मागील पंधरा दिवसात अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नमुना 8 अ, उत्पन्न प्रमाणपत्र , संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मंजुर लाभार्थी,श्रावण बाळ योजना, नवीन नळ कनेक्शन, मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र आदी लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
या सेवा पंधरवाड्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्यांशी निगडित असणाऱ्या तालुका प्रशासनातील सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी प्रलंबित अर्ज, तक्रारी,यांच्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत निपटारा करणे गरजेचे आहे.तेव्हा नागरिकांना या सेवा पंधरवाड्यात नागरिकांना शासकीय सेवा योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशा सूचना तहसिलदारांनी दिल्या. कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी मनीष दिघाडे तर आभार कर अधीक्षक आबासाहेब मुंडे यांनी मानले.