विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्याविरुद्ध पोलीसात तक्रार

चंद्रपूर :- शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शहरातील आंबेडकर कॉलेज,वरोरा नाका,जनता कॉलेज चौक,मनपा हद्दीतील शासकीय व खाजगी जागा, शहरातील पोस्ट / टेलीफोन पेटी, इलेक्ट्रिक खांब, रस्त्याच्या कडेची झाडे इत्यादींवर मुद्रा लोन योजना,आधार कार्ड लोन, ( ७२१७३१५८७९ ) हा मजकुर असलेले भिंतीपत्रके २५ सप्टेंबर मध्यरात्री शहरात जागोजागी लावले असल्याचे सहायक आयुक्त सचिन माकोडे यांना पाहणीदरम्यान आढळुन आले. संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

चंद्रपूर महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धांद्वारे शहर सुशोभीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे,विशेषतः उड्डाणपुल,शासकीय इमारती येथे माझी वसुंधरा अंतर्गत वॉल पेंटिंगची कामे करण्यात आली आहेत. रंगरंगोटीद्वारे संपूर्ण शहर सुशोभित झाले असताना भिंतीपत्रके लावून शहर विद्रुप करण्याचा प्रयत्नांविरुद्ध मनपाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नुकसानधारक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या - अनिल निधान

Wed Oct 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन ची शेती केली असून या सोयाबीन पीकावर येलो मोझ्याक सारख्या व्हायरस रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिके हाती येण्याआधीच पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे तेव्हा तहसील प्रशासनाने या नुकसानग्रस्त शेती भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी भाजप पदाधिकारी अनिल निधान यांनी तहसीलदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com