स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शन शिबीर..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

एमपीएससीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार स्पर्धाविषयक साहित्य वाटप

गोंदिया :- आपण 25-26 वर्षांचे झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. मग यश-अपयशाच्या प्रवासात अनेक वर्षे निघून जातात. वय वाढत जाते. एमपीएससी परीक्षेचे तीन टप्पे आहेत. प्रिलीमिनरी, मेन आणि इंटरव्यू यातील कोणत्याही एका टप्प्यात जरी अपयश आले तरी परतपरत पहिल्या टप्प्यावरून सुरुवात करावी लागते. यात एटीकेटी असा प्रकार नसतो. वय निघून जाणे, वेळ व पैशाचा अपव्यय होणे, अश्या जोखीम असतात. त्यामुळे लवकर यशस्वी व्हायचे असेल तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बालपणापासूनच करावा, असे प्रतिपादन सांख्यिकी विभाग गोंदियाचे उपसंचालक रूपेश राऊत यांनी केले.

तालुका पत्रकार संघ, तिरोडा व सी.जे. पटेल महाविद्यालयाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र-रासेयो आयक्युएसी तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषदेचे अटलबिहारी वाजपैयी सभागृहात स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरुवार, 15 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. याप्रसंगी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

उद्घाटन सी.जे. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य मृत्युंजय सिंह यांच्या हस्ते, मुख्याधिकारी करन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने सेवानिवृत्त प्राचार्य संजीव कोलते, पंचायत समितीचे उपसभापती हुपराज जमईवार, माजी नप उपाध्यक्ष राजेश गुणेरिया उपस्थित होते.

उपसंचालक राऊत पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनात आणले तर खूप काही करू शकतात. एक ‘सोर्स ऑफ इन्स्पिरेशन’ म्हणून मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघतो.असे आपल्या भाषणातुन व्यक्त केले. एमपीएसही टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करून नुकतेच आपल्या पदावर रुजू झालेले तिरोड्यातील विद्यार्थी मनोज वासनिक, रजत निनावे व अनुप हिरापुरे यांचा त्यांच्या पालकांसह तालुका पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. प्राचार्य मृत्युंजय सिंह यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. याप्रसंगी जवळपास 250 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. पत्रकार संघाला नाथे प्रकाशनाकडून निःशुल्क उपलब्ध झालेली स्पर्धा परीक्षाविषयक पुस्तके व नोकरी रोजगार संदर्भ या वेळी वाटप करण्यात आले.

प्रास्ताविक मुकेश अग्रवाल यांनी केले तर संचालन प्रा. विकास आळे यांनी केले. आभार पत्रकार लक्ष्मीनारायण दुबे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तालुका पत्रकार संघाचे सचिव विजय खोब्रागडे, रिबेल बुलेटिनचे मुख्य संपादक तथा सारस एक्स्प्रेस हिन्दी-मराठी साप्ताहिकाचे सहसंपादक देवानंद शहारे, संघाचे उपाध्यक्ष राधेश्याम नागपूरे, नितीन आगाशे, हितेंद्र जांभूळकर, हितेश रहांगडाले, अजय नंदागवळी, अमरदीप बडगे, सचिन ढबाले, मुरलीधर गोंडाणे, नीलकंठ साकुरे, संजीव केशरवानी आदि सर्व पत्रकार तथा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सभासदांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपूर विभागात 'सेवा पंधरवाडा' निमित्त प्रत्येक जिल्ह्यात आज शुभारंभ कार्यक्रम..

Sat Sep 17 , 2022
विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा नागपूर जिल्हयाचा शुभारंभ बचत भवनात नागपूर  : शासनाच्या विविध वेब पोर्टल तसेच कार्यालयामध्ये प्रलंबित असणाऱ्या सर्व अर्जांचा निपटारा उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘सेवा पंधरवाड्यात करण्यात यावा. त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे यांनी आज येथे दिले. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या 17 सप्टेंबरला सेवा पंधरवाडा निमित्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com