स्वतंत्र कला विद्यापीठासंदर्भात समितीची बैठक

– सविस्तर अहवाल सादर करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मुंबई :- महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी मागणी कला क्षेत्रातील नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासंदर्भात शासन स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, डि नोव्हो अभिमत विद्यापीठ कुलगुरू तसेच समितीचे अध्यक्ष डॉ. रजनीश कामंत, सर जे.जे. उपयोगिता कला महाविद्यालयाचे अधिव्याख्याता तथा प्रभारी संचालक संतोष क्षीरसागर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ हटाव कृती समितीने शासनास सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींच्या अनुषंगाने गठीत समितीने सखोल अभ्यास करून तातडीने सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, अशा स्पष्ट सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या.

राज्यातील कला महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात वर्गवारी करून सविस्तर प्रस्ताव तयार करावा, प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर वित्त विभागाकडे सादर करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

सध्या शासकीय किंवा विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना “पदवीधर” असा दर्जा दिला जातो, तर इतर कला महाविद्यालयांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना “पदविका धारक” मानले जाते. या असमानतेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक नुकसान होते. त्यामुळे कला महाविद्यालयांचे विद्यापीठात रूपांतर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ हटाव कृती समितीने केली आहे.

बैठकीत राज्यात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यामुळे कला शिक्षण अधिक दर्जेदार आणि व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त ठरू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन

Thu Feb 6 , 2025
– नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही बीड :- २०१४-१५ मध्ये सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून अनेक गावे पाणीदार झाली, भूजल पातळी वाढली, मात्र मराठवाड्याला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करायचे असेल तर पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणेही महत्त्वाचे आहे. समुद्रात वाहून जाणारे ५३ टीएमसी पाणी राज्यात नदी जोड प्रकल्प राबवून मराठवाड्यात आणण्यात येईल, ज्यामुळे आगामी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!