आयुक्तांच्या हस्ते मनपा शाळेतील पोषण आहार उपक्रमाला सुरूवात  

नागपूर :-नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते बुधवारी (ता:27) मनपा शाळेतील पोषण आहार उपक्रमाला सुरूवात करण्यात आली.

‘द आकांक्षा फाउंडेशन’द्वारे संचालित रामनगर मनपा इंग्रजी माध्यम शाळेतून अन्नामृत फाउंडेशन यांच्या सहकार्याने पोषण आहार उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. मनपाच्या सर्व 80 बालवाडी मध्ये 1900 विद्यर्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे. याची सुरूवात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली. रामनगर शाळेतील विद्यार्थ्यांना आयुक्त डॉ. चौधरी यांनी स्वत पोषण आहाराचे वितरण केले.

याप्रसंगी मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे, द आकांक्षा फाउंडेशनचे शालेय संचालक सोमसुर्व चॅटर्जी, अन्नामृत फाउंडेशनचे अध्यक्ष  श्यामसुंदर शर्मा, व्यवस्थापक राजेंद्र रमन, प्रवीण सहानी, बजरंग दास, निर्भय अजय संचेती, रविना संचेती, रमेश रांधड, महेंद्र सेठ, लोकेश पंडित, नंदकिशोर दास, के.व्ही. सुरेश,  रामानुज असावा, के.डी. देशपांडे, विनोद अग्रवाल, मनपाचे  विनय बगले यांच्यासह मनपाच्या शिक्षण विभागाचे कर्मचारी, रामनगर शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्येने उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शाळेची पाहणी करित आवश्य त्या सूचना शिक्षणाधिकारी यांना दिल्या.

शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे महत्त्व सांगितले. तसेच मनपाच्या बालवाडीत शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थांना उत्तम पोषण आहार मिळावा याकरिता मनपाने पोषण आहार उपक्रम हाती घेतला असून, याचा फायदा बालवाडीतील सर्व विद्यार्थांना होणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

याशिवाय नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेद्वारे चालविण्यात येणा-या शाळांमधून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि नवीन युगाशी स्पर्धा करणारे शिक्षण मिळावे या उद्देशाने मनपाद्वारे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यातील काही शाळा द आकांक्षा फाउंडेशन द्वारा उत्तम रित्या संचालित केल्या जात असल्याचेही डॉ. चौधरी यांनी यावेळी सांगितले.

अन्नामृत फाउंडेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर शर्मा यांनी सांगितले की, मुलाच्या आहाराची काळजी पालकांना नेहमीच असते. शाळकरी मुलांचे वय वाढीचे असते. या वयात मुलाची वाढ झपाटय़ाने होत असल्यामुळे त्यांना अन्नाची जास्त गरज असते. या कारणामुळे या वयात सर्व अन्नघटकांना फार महत्त्व असते. संतुलित आहार अशा वयात फार गरजेचा असतो. अशात मनपाने आपल्या शाळांमध्ये पोष्टीक आहार देण्याचे ठरविले असल्याचा मला आंनद आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द आकांक्षा फाउंडेशनचे शालेय संचालक सोमसुर्व चॅटर्जी यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यार्थी म्हणाले ‘थँक यू एनएमसी...’मनपा विषयी व्यक्त केली कृतज्ञता

Thu Nov 28 , 2024
– विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आयुक्तांचे मनमोकळे उत्तर नागपूर :- पाणी, स्वच्छता, रस्ते, फुटपाथ, पथदिवे, वाहतूक, मलजलवाहिनी, आरोग्य अशा अनेक सुविधा पुरवून प्रत्येक नागपूरकराला दिलासा देणाऱ्या नागपूर महानगरपालिकेला ‘थँक यू एनएमसी’ म्हणत विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांशी हितगुज साधली. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्सुकतेपोटी आयुक्तांना अनेक प्रश्न विचारलीत ज्याची उत्तरे देऊन आयुक्तांनी विद्यार्थ्यांचे समाधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!