संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 9:- दिनांक 27 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2022 पर्यंत रोजगार हमी कामठी तालुका आढावा समितीने ग्रामपंचायत बाबूलखेडा येथे चार दिवस निवासी राहून ग्रामस्थांना संकल्पना समजावून प्रत्येक घरी भेटी देऊन तसेच प्रभातफेरी, गावफेरी व शिवारफेरी ह्या माध्यमातुन संपूर्ण गावाचे तथा ग्रामपंचायतचे पुढील दहा वर्षाचे नियोजन करण्यात आले तसेच रोजगार हमी योजनेचे अधिकारी तसेच बीडीओ अंशुजा गराटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा 2005 अंतर्गत मजुरांना रोजगार मिळावा. या रोजगाराच्या माध्यमातून ग्रामपातळीवर शाश्वत मत्ता निर्मिती व्हावी. जल, जंगल, माती संवर्धना बरोबरच गावांमध्ये रस्ते, विहिरी, तळी, शेतीसुधारणा, पर्यटन विकास यासारखी कामे करून कुटुंब-गाव समृद्ध व्हावे. या उद्देशाने पुढील १० वर्षांचा सुक्ष्म कृती आराखडा तयार करण्यासाठी घेण्यात आलेल्या गावसभेतून कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत बाबूलखेडा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्याला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दिघाडे, पंचायत विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे, ग्रा प सरपंच निशाताई दिवाकरजी जिचकार,उपसरपंच चंदाताई नरेशजी पाटील, समिती सदस्य सविताताई जिचकार, ग्रामसेवक खारकर,ग्रामरोजगार सेवक वसीम शेख, नवलकिशोर डडमल , अश्विनी तरारे,अंगणवाडी सेविका, ग्रा प कर्मचारी, ग्रा प ऑपरेटर,तसेच प्रशिक्षण देण्यास आलेले मुख्य प्रशिक्षक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रुपेश धापके,प्रशिक्षण घेण्यास आलेले ग्रामरोजगार सेवक बिना चे आकाश निखाडे, गुमथी चे ग्रामरोजगार सेवक मोरे, कोराडी चे ग्रामरोजगार सेवक स्नेहा पारसे, लोंणखैरी चे ग्रामरोजगार सेवक सपना निर्मल, खैरी चे ग्रामरोजगार सेवक संबोधी गजभिये, तांत्रिक सहाय्यक कृषी चे जयपाल भणारे, तांत्रिक सहाय्यक स्थापत्य हेमंत सोनवणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये एका गावाची निवड करुन यासाठी दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याच्या घेतलेल्या निर्णया मधून रोजगार हमी कामठी तालुका आढावा समितीमध्ये बाबूलखेडा ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली होती. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील कुटुंबास 262 कामापैकी जास्तीत जास्त कामांचा लाभ देऊन कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचवण्याचा तथा कुटुंबांना लखपती करण्याचा मानस या योजनेतून घेण्यात आला आहे.मनरेगा योजनेतून दशवार्षिक नियोजन केल्यास गावातील प्रत्येक कुटुंबास लाभ देणे शक्य होणार आहे असे मत प्रशिक्षकांनी व्यक्त केले.यावेंळी व्यक्तिक फळबाग लागवड, बांधावर वृक्ष लागवड, सिंचन विहीर, पाईप, टाके, गांढुळ टाके, शोषखड्डे, तसेच इतर लाभाच्या योजना व सार्वजनिक लाभाच्या योजना म्हणजे पांदण रस्ते, सिमेंट रस्ते, नाला खोलीकरण/सरळीकरण,बांध बंदिस्त बंधारे, संमतल घर खड्डे, गार्डन आदी संदर्भात प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष पाहणी करून आराखड्यात कामे समाविष्ट केलेली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा ग्रा प बाबूलखेडा निवासी प्रशिक्षणास ग्रामस्थांचा उत्तुंग प्रतिसाद मिळाला असून योजना पुरेपूर अंमलात येईल याकरिता येत्या पंधरा दिवसात कामे सुरू करण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.या चार दिवसीय प्रशिक्षणास संपूर्ण शासन दारी असल्याचे चित्र मनरेगा बाबत प्रथमच दिसून आले.संपूर्ण अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी तथा ग्राम पंचायत स्तरावर कार्यान्वित यंत्रणांचे सहभाग उल्लेखनीय होते.आभार प्रदर्शन वेळी दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा ग्रा प ला सुपूर्द करण्यात आला.पुढे ग्रामसभेची मान्यता घेऊन आराखडा पंचायत समितीच्या मान्यतेकरिता पाठविण्यात येणार असल्याची माहिती ग्रा प चे सरपंच ,सचिव यांनी दिली.
बीडीओ अंशुजा गराटे यांनी पुढील दहा वर्षांसाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून यावर अंमलबजावणी करण्यासाठी बाबूलखेडा ग्रामपंचायतची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून या आराखड्यावर काम करण्यासाठी गावामध्ये ऐक्य निर्माण करण्यासह गावाचा आत्मविश्वास वाढवा असे मौलिक मार्गदर्शन केले.
बाबूलखेडा येथे ‘दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्याला सुरुवात
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com