बेला : लोकजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ,राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा पंचक्रोशीतील शिक्षण महर्षी दिवं. चंपतरावजी देशमुख यांचा प्रथम स्मृतिदिन लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील मुलेवार होते. मंचावरील अतिथी प्रा. नितीन पुरी, पर्यवेक्षक मिलिंद शाव, लक्ष्मण खोडके गणेश लांबट आरती मुलेवार यांनी आपल्या कविता व भाषणातून देशमुख यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
स्मृतिदिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये गायन, बचाव, रांगोळी , निबंध कथाकथन व हस्ताक्षर अशा विविध स्पर्धा व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा समारोप स्मृतिदिनाला करण्यात आला. स्पर्धा व स्मृतिदिनाचे यशस्वीतेसाठी संजय वडपल्लीवार, आशिष देशमुख, प्रा. राजरतन डांगे, श्रद्धासाळवे, उत्तरा चीकराम, प्रगती लोहकरे, गिरीधर मेश्राम, व सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. संस्थेच्या अध्यक्ष वर्षा बाभुळकर सचिव ऍड सुबोध देशमुख, उपाध्यक्ष बुलाराम तळवेकर व संचालक राजीव देशमुख यांनी सुद्धा देशमुख यांना आदरांजली वाहून त्यांचे स्मरण केले.