आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला

– प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्पण केली श्रद्धांजली

नागपूर :- पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीने कर्तबगार व निष्ठावंत लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्पण केली.

ते म्हणाले की, मुक्ता टिळक यांनी नगरसेवक, महापौर आणि आमदार म्हणून सक्षमपणे लोकसेवा केली. शहरातील राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक जीवनात त्या सक्रीय होत्या. त्यांना लोकमान्य टिळक यांच्या घराण्याचा वारसा लाभला होता व तो त्यांनी जबाबदारीने जपला.

भारतीय जनता पार्टीचे काम करताना त्यांनी पक्षाचा ‘संगठन सर्वोपरी’, हा मंत्र जपला आणि आपल्या आचरणाने कार्यकर्त्यांसमोर उदाहरण निर्माण केले. त्यांच्या निधनाने पक्ष संघटनेची हानी झाली आहे. आपण त्यांना भाजपा, महाराष्ट्रतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मला निलंबित केलात तरी मी राज्यातील जनतेसाठी लढत राहणार - जयंत पाटील

Thu Dec 22 , 2022
राज्यसरकारच्या या हुकुमशाही कृतीचा जयंत पाटील यांनी केला निषेध… नागपूर  :- मला निलंबित केलात तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहणार असल्याचे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यसरकारच्या या हुकुमशाही कृतीचा निषेध केला. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून होत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com