कोदामेंढी :- दिवाळीला अवघ्या पाच ते सहा दिवसांच्या कालावधी उरलेला असताना मौदा तालुक्यातील 63 ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या 126 गावातील नागरिक आपापल्या घरादाराची साफसफाई व रंगरंगोटीमध्ये व्यस्त दिसत असून नवरात्री पूर्वीपासून तालुक्यातील गावागावातील गल्लोगल्लीमध्ये रांगोळी विकण्यासाठी कोणी हात ठेल्यावर तर कोणी दुचाकी वर एक किंवा दोन रांगोळी विक्रेते फिरताना दिसायचे . मात्र आता दिवाळी जवळच आलीअसल्याने त्यांची संख्या अत्यंत वाढलेली असून रांगोळी विक्रेतेही हायटेक झालेले आहेत . चार चाकी गाडी ग्राहक वर्गाला आकर्षित करण्यासाठी भोंगा लावून आली दिवाळी ,घ्या रांगोळी म्हणत रांगोळी विक्रेत्यांची गंगा तालुक्यातील गल्लोगल्लीत दिसत असून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत हे विशेष! :
याबाबत दुचाकीवरून रांगोळी विकणारे अरोली येथील विक्रेते राजू कोक्कडे तालुक्यातील गावागावातून फिरता फिरता येथे आले असता त्यांनी पांढरी रांगोळी पंधरा रुपये पायली तर रंगीत रांगोळी पाच रुपये ग्लास विकत असल्याचे सांगितले .