नागपूर :- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 24 व्या पार्टी काँग्रेसचा नुकताच विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे समारोप झाला. संपूर्ण भारतातून जवळपास 900 प्रतिनिधींनी या पार्टी काँग्रेसमध्ये सहभाग घेतला. विविध मुद्द्यांवर 5 दिवस चर्चा झाली आणि पुढील तीन वर्षांसाठी नवीन परिषद आणि पदाधिकारी निवडण्यात आले. कॉ.डी.राजा यांची पुढील तीन वर्षांसाठी पार्टीच्या सरचिटणीसपदी पुन्हा निवड झाली आहे. कॉम.डॉ. भालचंद्र कानगो (महाराष्ट्र) यांची केंद्रीय सचिवमंडळात फेरनिवड झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील पाच कॉम्रेड को. डॉ. रतिनाथ मिश्रा, कॉ. मोहन शर्मा, कॉ.सी.जे.जोसेफ, कॉ. श्याम काळे आणि कॉ.डॉ. युगल रायलु यांनी ऐतिहासिक या 24 व्या शीर्ष संमेलनात सहभाग घेतला. कॉ.रतिनाथ मिश्रा आणि कॉ. मोहन शर्मा यांना सर्वात ज्येष्ठ प्रतिनिधींपैकी एक असण्याचा मान मिळाला होता, डॉ.युगल रायलु यांना क्रेडेंशीयल समितीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. क्रेडेंशीयल समितीचे इतर सदस्य आहेत, कॉ. विद्या सागर गिरी (बिहार) कॉ.सारिका श्रीवास्तव (M.P.) कॉ.शुभम बॅनर्जी (पश्चिम बंगाल) कॉ.व्ही. उन्नीकृष्णन (केरळ) आणि कॉ. फूलचंद यादव (उ.प्र.) ब-याच दिवसांनी हा सन्मान एका नागपूरकराला मिळाला आहे.
डॉ.रायलू यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून क्रेडेंशीयल अहवाल सादर केला. ते बोलत असताना, अधिवेशन केंद्राच्या व्यासपीठावर आणि इतर स्क्रीनवर सर्व आकडेवारी आणि डेटाचे विश्लेषण केले जात होते. डॉ.रायलु यांच्या अध्यक्षतेखालील क्रेडेंशीयल समितीने केलेल्या कार्याचे संमेलनात उपस्थित आणि भाकपच्या वतीने कौतुक केले.