गडचिरोली, दि.24, जिमाका : गडचिरोली जिल्ह्यात कोविड लसीकरणाला गती देण्याचे व नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे. जिल्हयातील 11.88 लक्ष लोकसंख्येपैकी 8.35 लक्ष पात्र नागरिकांना कोरोना लसीकरणाचे उद्दिरष्ट ठेवण्यात आले आहे. पैकी लशीचा पहिला डोस 6,14,141 नागरिकांनी घेतला आहे त्याची टक्केवारी 73.55 आहे. तर दुसरा डोस 2,86,022 म्हणजेच 34.25 टक्के लोकांनी घेतला आहे. यामध्ये पहिला डोस 2,20,866 नागरिकांनी तर दुसरा डोस 5,48,985 नागरिकांनी घेणे बाकी आहे. पहिला व दुसरा डोस मिळून आत्तापर्यंत जिल्हयात 9,00,163 डोस देण्यात आले आहेत.
पहिला डोस घेण्यात लोकसंख्येच्या तुलनेत चामोर्शी 1,04,139 संख्येने आघाडीवर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली तालुका 1,00,782 डोस घेणारा आहे. तिसऱ्या क्रमांकावर अहेरी तालुका असून आत्तापर्यंत लशीचे पहिले डोस 92,9,36 नागरिकांनी घेतले आहेत.
तसेच उद्दीष्टानुसार सर्वांत जास्त पहिला डोस घेणे शिल्लक तालुक्यांमध्ये 44,198 डोस सह अहेरी तालुका प्रथम क्रमांकावर आहे. पहिला डोस शिल्लक असलेला तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर एटापल्ली तालुका असून त्या ठिकाणी 36,672 नागरिकांना लस देणे बाकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर पहिला डोस शिल्लक असलेला जास्त संख्येचा तालुका चामोर्शी असून 32,739 जण डोस घेणे बाकी आहेत. या तीन तालुक्यात लसीकरणाची गती वाढविण्याबाबत प्रशासनातील यंत्रणेला जिल्हाधिकारी यांनी सूचना दिलेल्या आहेत.
*तालुकानिहाय स्थिती* – (कंसात लसीकरण झालेले व बाकी )
*पहिला डोस* – गडचिरोली (100782-17723), वडसा (54862-9924), आरमोरी (59773-13511), कोरची (26921-4836), कुरखेडा (64672-2402), धानोरा (41486-20953), भामरागड (16459-10735), सिरोंचा (33563-22997), अहेरी (48738-44198), मुलचेरा (33007-4176), एटापल्ली (29739-36672), चामोर्शी (104139-32739).
*दुसरा डोस* – गडचिरोली (54423-64082), वडसा (29319-35467), आरमोरी (30790-42494), कोरची (11143-20614), कुरखेडा (36525-30549), धानोरा (17966-44473), भामरागड (4132-23062), सिरोंचा (12390-44170), अहेरी (21223-71713), मुलचेरा (14875-22308), एटापल्ली (8489-57922), चामोर्शी (44747-92131).
सतीश कुमार गडचिरोली