मणिपूरच्या निंदनीय घटनेसंदर्भात बसपाचे सामूहिक निवेदन 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- बहुजन समाज पार्टी कामठी शहराच्या वतीने देशात होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बसपा कामठी शहराध्यक्ष विनय ऊके यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कामठी तहसीलदारामार्फत केंद्र सरकार व राज्य सरकार यांना निवेदन पाठवण्यात आले.

मणिपूर येथे मागील दोन महिन्यापासून होत असलेल्या दंगलीच्या बंदोबस्त करून दंगलखोरावर कठोर कारवाई करून मणिपूर सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी बसपा द्वारे करण्यात आली. त्याचप्रमाणे सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील बेडग गावातील परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने स्वागत कमान तोडण्यारवर कारवाई करून ती कमान नव्याने उभारण्यात यावे अशी बसपा कामठी शहराद्वारे मागणी करण्यात यामध्ये आली.

यावेळी प्रामुख्याने बसपा स्टार प्रचारक मोहम्मद सफी , विधानसभेचे अध्यक्ष चंद्रगुप्त रंगारी ,माजी विधानसभा अध्यक्ष ईजी. अध्यक्ष विक्रांत मेश्राम, विधानसभा उपाध्यक्ष अनिल कुरील, नागसेन गजभिये, नितेश टेंभेकर ,सुधा रंगारी, माजी सभापती रमा गजभिये,माजी नगरसेवक विकास रंगारी , भाऊराव कुर्वे ,मनोज रंगारी ,विशाल गजभिये, राजन मेश्राम व अन्य कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अतिरिक्त शिक्षक असताना केलेल्या पदभरतीची चौकशी करा

Tue Jul 25 , 2023
– आमदार सुधाकर अडबाले यांची मंत्री सावे यांच्याकडे अधिवेशनात मागणी नागपूर :-  राज्‍यात इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत ९७७ शाळा आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ३२ शाळा कार्यरत आहेत. या शाळांत मोठ्या प्रमाणावर अतिरिक्‍त शिक्षक असताना विभागातील सहाय्यक आयुक्त चंद्रपूर व प्रादेशिक उपायुक्त नागपूर यांच्या संगनमताने संस्थाचालकांनी अनेक पदभरतीची कार्यवाही केलेली आहे. याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com