कोदामेंढी :- येथे व परिसरात आज दिनांक 10 नोव्हेंबर रविवार सायंकाळ पासून वातावरण ढगाळ झाल्याने धान उत्पादक शेतकरी चिंतातूर झालेला आहे .सध्या धान पीक तोंडावर आलेला असून काहींनी धान कापायला मागील आठ दिवसांपूर्वी पासून 3000 रुपये एकरच्या दराने मशीनच्या साह्याने सुरुवात केलेली आहे. मागच्या वर्षी शेतकऱ्यांना मालामाल केलेल्या हिरव्या मिरचीने यंदा अति जास्त पाऊस झाल्याने ती हिरवी मिरची लाल करत असल्याने म्हणजेच खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी होत असल्याने आधीच शेतकरी त्रस्त असताना ,आता धान पीक तोंडावर आल्याने आणि ढगाळ वातावरण झाल्याने पावसाची शक्यता वाढल्याने शेतकरी अगदी चिंतादूर झालेला आहे. यंदा शेतकऱ्यांवर वारंवार अस्मानी संकटाच्या सामना होत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे हे विशेष!