नागपूर :- लायन्स क्लब ऑफ नागपूर हेरीटेज मार्फत बुधवार आठवडी बाजार, सक्करदरा येथे कापडी पिशव्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कापडी पिशव्या म्हणजे स्वच्छ्ता आणि पर्यावरणाला संजीवनी, प्लास्टिक पिशवी न वापरता प्रत्येकाने कापडी पिशवी वापरण्याचा संकल्प करूया असे आवाहन लायन्स क्लब हेरीटेज या समाजसेवी संस्था द्वारे करण्यात आले.प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होत नाही त्यावर उपाय म्हणून क्लब तर्फे 125 पिशव्यांचे वितरण बुधवार आठवडी बाजार सक्करदरा येथे बाजार करण्याकरिता आलेल्या पुरुष व महिलांना आणि दुकानदारांना करण्यात आले आणि प्रत्येकाने कापडी पिशव्यांचाच वापर करावा असे आवाहन यावेळी क्लब मार्फत करण्यात आले.कार्यक्रमाला अध्यक्ष मृदुला हेडाऊ, सचिव विजया वाईंदेशकर, कोषाध्यक्ष स्मिता रेवतकर, रिजन चेअरपर्सन नितीन लोणकर, झोन चेअरपरसन, समिर पंडीत क्लब प्रशासक विवेक वैद्य, जनसंपर्क अधिकारी प्रमोद हेडाऊ, विवेक प्रतापे, गजेंद्र पोटे, शशीकांत वाघमारे उपस्थित होते.
कापडी पिशव्या हा प्लास्टिक पिशव्याला उत्तम पर्याय – प्रमोद हेडाऊ
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com