धरमपेठ झोनमध्ये स्वच्छता मॅरेथॉन दौड

– स्वच्छते प्रति जनजागृतीसाठी पुढाकार : मनपा व प्रहार मिलिटरी स्कूलचे आयोजन

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि प्रहार मिलीटरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने युवा दिनानिमित्त धरमपेठ झोनमधील प्रभाग १४ मध्ये स्वच्छता मॅरेथॉन दौडचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूर शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिका आणि प्रहार मिलीटरी स्कूल यांच्याद्वारे पुढाकार घेण्यात आला. यातून ३ किमी अंतराची स्वच्छता मॅरॅथॉन दौड घेण्यात आली. कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ पर्यावरण आणि स्वच्छ जीवनशैलीला प्रोत्साहित करण्यावर विशेष लक्ष देण्यात आले.

३ किलोमीटरच्या स्वच्छता मॅरॅथॉन दौडमध्ये प्रहार आर्मी स्कूल, मनपा वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा, सरस्वती स्कूल आणि तायडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कार्यक्रमात प्रहार मिलिटरी स्कूलचे उपप्राचार्य भालचंद्र कागभट, धरमपेठ झोनचे मुख्य स्वच्छता अधिकारी दिनदयाल टेंभेकर, महानगरपालिकेतील आयईसी पथकाचे सदस्य आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

प्रहार मिलिटरी स्कूलचे उपप्राचार्य भालचंद्र कागभट आणि धरमपेठ झोन मुख्य स्वच्छता अधिकारी दिनदयाल टेंभेकर यांनी हिरवी झेंडी दाखवून स्वच्छता मॅरॅथॉन दौड चा शुभारंभ केला. मॅरॅथॉनमध्ये भाग घेणारे विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपल्या प्रतिभेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यावेळी दौडमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना मेडल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

साहित्य अकादमी पुरस्कार प्रक्रियेत बदल

Sat Feb 1 , 2025
नवी दिल्ली :- साहित्य अकादमीने मान्यता दिलेल्या २४ भारतीय भाषांमधील दरवर्षी दिल्या जाणाऱ्या देशातील सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. साहित्य अकादमीने पहिल्यांदाच लेखक, प्रकाशक आणि त्यांच्या हितचिंतकांकडून वर्ष २०२५ च्या मुख्य पुरस्कारासाठी 24 भाषांमधील पुस्तके निवडण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुस्तके सादर करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे. २०२५ च्या पुरस्कारांसाठी, २०१९ ते २०२३ (१ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!