दपूम रेल्वेत पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा जागर

– मोतीबाग कारखान्यात उपक्रम

नागपूर :- दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या मोतीबाग कारखान्यात पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक विश्वलाल एन. यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य यांत्रिक अभियंता गुंजन वासनिक आणि कारखाना व्यवस्थापक बी. आर. मेश्राम यांच्या कारखाना आणि कार्यालयात स्वच्छता करून जनजागृती करण्यात आली.

स्वच्छता सप्ताहांतर्गत स्काऊट-गाईडच्या मुलांनी स्वच्छता या विषयाला घेऊन पथनाट्य सादर केले. आपले घर, परिसर आणि कार्यालय स्वच्छ राहिल्यास आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. मन प्रसन्न राहून नवीन ऊर्जा मिळते, असा संदेश या पथनाट्याद्वारे देण्यात आला. यावेळी मुख्य व्यवस्थापक विश्वलाल एन. यांनी कर्मचार्‍यांना स्वच्छतेची शपथ दिली. या उपक्रमानंतर अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. यावेळी उपमुख्य अभियंता गुंजन डी., सहायक कार्मिक अधिकारी सुशीलकुमार लकडा, सहायक मंडळ विद्युत अभियंता अजयकुमार सिंह, लेखा अधिकारी अवधेशकुमार साह यांच्यासह मोतीबाग कारखाना येथील वरिष्ठ सेक्शन इंजिनीअर, मुख्य कार्यालय अधीक्षकांनी स्वच्छता उपक्रमात सहकार्य केले. संचालन आणि राहुल डोंगरे यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्य कल्याण निरीक्षक अनुपकुमार आवळे, धरमसिंग मीणा यांच्यासह कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 21 सप्टेंबर रोजी जुहू बीच येथे ‘स्वच्छता मोहीम’

Fri Sep 20 , 2024
मुंबई :- नागरिकांमध्ये सागरी प्रदूषण विषयी जागृती करणे आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देणे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २१ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता जुहू किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय वने, पर्यावरण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com