नागपूर :- जी-20 निमित्त शहराला सुशोभीत आणि चकचकीत केले जात आहे. ठिकठीकानी रंगरंगोटी आणि भिंतीवर चित्र काढले जात आहेत. यावरून प्रेरणा घेत लोकसेवा प्रीपेड बुथ ऑटो चालक मालक संघटनेच्या पदाधिकार्यांनी रेल्वेस्थानक ऑटो थांबा परीसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.
संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ अंसारी यांनी स्वयंप्रेरणेने प्रीपेड बुथ थांब्यावर स्वच्छता मोहीम राबविली. शहर स्वच्छ होत असताना आपणही आपल्या थांब्यावर स्वच्छता राबवावी असा विचार करून त्यांनी ऑटोचालकांशी चर्चा केली. संपूर्ण काडी कचरा एका डब्यात जमा केला नंतर पाणी शिंपडून परिसराला स्वच्छ केले. स्वच्छतेची ही मोहीम पुढेही अशीच राबविणार असा मानस संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ यांनी व्यक्त केला.
या मोहीमेत अल्ताफ अंसारी, प्रदीप पाटील, मोहम्मद खान, बाबू शेख, प्रदीप बाबाजी, इरफान अंसारी, जाकीर अली, प्रवीण बनारसे, श्याम धमगाये, इदू अंसारी, हर्षवर्धन कांबळे, अली गवंडर, राजू चांदेकर, दशरथ जेरीले यांच्यासह 25 ते 30 चालकांनी श्रमदान केले.