“मिनी सक्शन कम रिसायकल” मशिनच्या सहाय्याने गांधीबाग झोनचे स्वच्छता कार्य

– आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर :- नागपूर शहरातीलगजबजलेल्या व दाट वसाहतीतील सीवर चेंबरची स्वच्छता करण्यासाठी अनुकूल अशा “मिनी सक्शन कमरिसायकल” मशिनच्या सहाय्याने नागपूर महानगरपालिका गांधीबाग झोन अंतर्गत परिसरातीलस्वच्छता कार्याला गुरवार(ता.१८) पासून सुरुवात करण्यात आली.

आमदार प्रवीण दटके यांच्या हस्तेहिरवी झेंडी दाखवित “मिनी सक्शन कम रिसायकल” मशिनच्या कार्याला बडकस चौक येथून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी गांधीबाग झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, उप अभियंता प्रवीण कोटांगळे, मूख्य स्वच्छता अधिकारी सूरेश खरे व सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे इतर कर्मचारीतसेच मेसर्स आर्यन पंप अँड इन्वायरो सोल्यूशन्स प्रा. लि.चे विलास ठाकरे, अविनाश बडवाईक, अविनाश भुते यांच्यासह इतर समाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

गांधीबाग झोन अंतर्गत बडकस चौक येथे “मिनीसक्शन कम रिसायकल” मशिनच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली. “मिनी सक्शन कमरिसायकल” मशिन जेटींग व सक्शन हे दोन्ही कामकरण्यास सक्षम आहे, जेटींग करिता गटर चेंबरचे पाणी या मशिनमध्ये रिसायकल करुन वापरल्याजाते. ज्यामूळे या मशिन मध्ये जेटींगकरिता वारंवार ताजे टाकण्याची गरज भासत नाही.मशिन ३००० ली. सक्शन कॅपेसिटीची असून, १०-१२ फूट खोल गडर चेंबरची सफाई करण्यास सक्षम आहे. या मशिनचे सक्शन पाईप ६० ते ७० फूट लांबीचे आहे.

मशिन लहान आकाराची असल्याने या मशिनद्वारे कमी रुंदीच्या रस्त्यावरील गडर चेंबरची सफाई करता येणार आहे. त्यामुळे इतवारी, महाल गांधीबाग सारख्या दाट लोकवस्ती क्षेत्रात जेथे रस्त्यांची रुंदीकमी आहे, अशा ठिकाणी या मशिनद्वारे गडर सफाई काम करण्यास मदत मिळेल. तसेचया मशीनची देखभाल व दुरुस्तीचे काम मेसर्स आर्यन पंप अँड इन्वायरो सोल्यूशन्स प्रा. लि. द्वारा करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनिल पांडे, परमेशा झाडे ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ खासदार क्रीडा महोत्सव : रायफल शूटिंग स्पर्धा

Fri Jan 19 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील रायफल शूटिंग स्पर्धेत अनिल पांडे आणि प्रमेशा झाडे हे अनुक्रमे रायफल आणि पिस्टल प्रकारात ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ ठरले. आहुजा नगर येथील तालुका क्रीडा संकुल येथे रायफल शूटिंग स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेमध्ये १४, १७, १९ वर्षाखालील आणि खुल्या गटात मुले व मुलींची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com