रामटेक :- स्वच्छतेचा सुवर्णमहोत्सवा अंतर्गत श्रीराम गड मंदिर परिसर रामटेक , तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन ,दिवाणी न्यायालय ,भूमी अभिलेख कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या अध्यक्षतेखाली विविध सामाजिक संघटना यांच्या तर्फे गडमंदिर
परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते , तहसीलदार बाळासाहेब मस्के , परिषद च्या प्रभारी मुख्याधिकारी अर्चना वंजारी , एसएनटी कॉलेजच्या प्राचार्या संगीता टक्कमोरे , लाड , आनंदधाम रामटेक चे संस्थापक लक्ष्मण मेहेर ,
रामटेक भगिनी मंडळ च्या अध्यक्षा ज्योती कोल्लेपरा, वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष राहुल कोठेकर, सचिव अजय मेहेरकुळे , सागर धावडे , मिथुन मथुरे, रामटेक सौंदर्य सृष्टी संस्था रामटेक चे सर्व सदस्य , उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व संस्थांचे आभार मानले, हा कार्यक्रम 15 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरु राहणार असून सर्वांनी विविध प्रकारचे उपक्रम राबवून शासनाच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्याची आवाहन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केले.