पूरग्रस्त गावातील पाण्याचे स्रोत प्राधाण्याने स्वच्छ करा – आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

– पूर पाहण्यासाठी गर्दी करू नका

गडचिरोली :- पुराचे पाणी ओसरल्यानंतर संबंधित पुरग्रस्त गावांमध्ये साथरोग पसरू नये म्हणून पाण्याचे स्रोत प्राधान्याने स्वच्छ करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज आपत्ती व्यवस्थापन समितीचे बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, पोलिस अधिक्षक निलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच दूरदृष्य प्रणाली द्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी पुढे यांनी पुढे बोलताना सांगितले की पूर ओसरल्यावर मच्छर होऊ नये म्हणून गावागावात फवारणी करून घ्यावी. हॅण्डपंप, विहिरी आदी पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणे ब्लिचिंग टाकून विहिती पद्धतीने स्वच्छ करावी. रत्यावरील खड्डे बुजवून घ्यावे, विद्युतप्रवाह सुरळीत करणे, सध्या पावसाचा जोर कमी असला तरी नदी नाल्यांना पाण्याचा प्रवाह जोरात आहे, त्यामुळे पाणी वाहत असताना नदी नाला रपट्या वरून कोणालाही जाऊ देऊ नये व त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवणे आदी सूचना त्यांनी दिल्या. अनेक ठिकाणी पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण रूग्णालयात खबरदारी म्हणून आगावू रक्तपिशव्या उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना दिल्या. यासाठी रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी पोलीस जवानांकडूनही रक्तदान उपलब्ध करता येईल असे सांगितले. पूर परिस्थितीमध्ये कोणत्याही मदतीसाठी रात्री अपरात्री पोलीस विभाग तयार असल्याचे सांगून सर्व यंत्रणेने आपसी समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

अहेरी उपविभागाचा आढावा

अहेरी उपविभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी तहसील कार्यालय अहेरी येथे आज सकाळी पूर परिस्थिती, पीक परिस्थिती, रस्ते व आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. पुरामुळे बाधित मार्गाची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, शेती पिकांचे,घरांचे, पशुधनाचे व इतर नुकसानीबाबत अद्यावत माहिती संकलित करून तात्काळ पंचनामे करावे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ करणे, सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयीन राहणे व टीमवर्क ने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीला संबंधीत विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मध्यप्रदेश और महाराष्ट्र के बीच दोनो वर्ग का फायनल आज

Sun Jul 28 , 2024
– मेजबान छत्तीसगढ, व राजस्थान दोनो वर्ग के तीसरे चौथे स्थान के लिए खेलेंगें – वेस्ट जोन जूनियर हॉकी प्रतियोगिता का समापन आज राजनांदगांव :- बालक एवं बालिका वर्ग में मध्यप्रदेश और हॉकी महाराष्ट्र द्वितीय वेस्ट जोन जूनियर हॉकी प्रतियोगिता के फायनल में आज 28 जुलाई को खेलेगी। प्रतियोगिता में बालिका वर्ग का फायनल मैच प्रातः 09 बजे से खेला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!