सेंट जेनेली शाळेतील 9 व्या वर्गातील विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू येरखेडा रहिवासी व सेंट जेनेली शाळेत 9 व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी हा आपल्या आईसोबत औषधी दुकानातून औषध घेत असता अचानक भोवळ येऊन पायऱ्यावरून खाली पडल्याने डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीने नागपूर च्या किंगस्वे रुग्णालयात उपचार घेत असता उपचारादरम्यान या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान घडली असून मृतक मुलाचे नाव अंतरिक्ष उर्फ लक्की दिनेश गणवीर वय 14 वर्षे रा न्यू येरखेडा कामठी असे आहे.

प्राप्त माहिती नुसार सदर मृतक मुलगा हा एक दिवसापूर्वी आपल्या घरी झोपले असता झोपेतच डोळ्याला किडा चावल्याने उपचारार्थ आपल्या आईसोबत बी बी कॉलोनी च्या वकील हॉस्पपिटल कडे उपचार केला.डॉक्टरने सांगितलेल्या औषधी विकत घेण्यासाठी आई सोबत नजीकच्या औषधी दुकानात गेले असता या मुलाला अचानक भोवळ आली ज्यामुळे हा मुलगा पायऱ्यावरून खाली पडला व उलटी केली.यावेळी त्याच्या डोक्याला गुप्त मार लागल्याची जाणीव होताच त्याला नजीकच्या लाईफ लाईन हॉस्पिटल, सिटी लाईन हॉस्पिटल येथे हलविण्यात आले मात्र परिस्थिती नाजूक असल्याने या मुलाला नागपूर च्या किंगस्वे हॉस्पिटलला काल दुपारी 1 वाजता हलविण्यात आले.मात्र उपचारदरम्यान काळाने झडप घेतली व सदर मुलगा आज दुपारी 2 वाजता मरण पावला.

ही बातमी मुलाच्या आई वडिलांना मिळताच आई वडिलांनी एकच दुःखाचा हंबरडा फोडला. मात्र वेळेच्या नियतीपुढे कुणाचे चालत नाही अशीच स्थिती झाली..निमित्त झाले फक्त किडा चावण्याचे …मात्र हा क्रियाकाळ त्या मुलाच्या जीवावर बेतला..व जीवनाचा बराच अनुभव घेण्याआधी सदर मुलगा काळाच्या नियतीपुढे मरण पावला…मृतक मुलाला एक लहान भाऊ असून तो त्याच सेंट जेनेली शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत आहे.वडील दोन पाय व एका हाताने अपंग आहे तर आई घरकाम करते.या अशा परिस्थितीत जीवनाशी संघर्ष गाठत सुखमय जीवन जगत असताना अचानक मुलाला किडा चावल्याचे निमित्त होऊन मरण पावल्याची ही घटना अतिशय दुखमय असून चांगल्या सुखी परिवार मुलाच्या मृत्यूमुळे शोकमय वातावरणात विलीन झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरोघरी सर्वेक्षणकरिता येणाऱ्या आशा स्वयंसेविका व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे - डॉ शबनम खाणुनी

Wed Jul 19 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – विशेष इंद्रधनुष्य मोहिम कार्यशाळा कामठी :- कामठी नगर परिषद अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नुकतेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शबनम खाणुनी यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त आरोग्य कर्मचारी व आशा वर्करला मिशन इंद्रधनुष्य बाबत आढावा घेत मार्गदर्शन केले.तसेच घरोघरी सर्वेक्षणकरिता येणाऱ्या आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. शबनम खाणुनी यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com