इयत्ता 12वीचा निकाल आज, शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल 

नागपूर :- फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल महामंडळाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. ही संकेतस्थळे खालील प्रमाणे आहेत.

1) mahresult.nic.in

2) http://hscresult.mkcl.org

3) www.mahahsscboard.in

4) https://results.digilocker.gov.in

5) www.tv9marathi.com

6) http://results.targetpublications.org

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये डिजीटल गुणपत्रिका संग्रहीत करुन ठेवण्याची सोय उपलब्ध आहे.

यासोबतच mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतिसाठी दिनांक 22 मे, 2024 ते 5 जुन 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल, अशी माहिती नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पार्थ मिलींद बारहाते यांची जपान येथे इंटरशीपकरीता निवड

Mon May 20 , 2024
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे सुपुत्र पार्थ मिलींद बारहाते यांची जपानमधील होक्काईडो राज्यातील सपरो येथील ए.डब्ल्यू,एल. कंपनीत इंटरशीपकरीता निवड झाली आहे. पार्थ हा इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर (आय.आय.टी.) येथे बी.टेक. अभ्यासक्रमाला चवथ्या वर्षाला आहे. पाच वर्षीय इंटेग्रेटेड डबल डिग्री प्रोग्राम बी.टेक. अधिक एम.टेक. (बायोटेक्नॉलॉजी) अभ्यासक्रम तो पूर्ण करीत आहे. ए.डब्ल्यू.एल. या नामांकीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!