दि. 13/09/2022 ते दि.30/09/2022 राबविण्यात येत आहे.
नागपूर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरात सक्रिय क्षयरुग्ण शोध (ACF) व कुष्ठरोग शोध मोहिम (LCDC) दि. 13/09/2022 ते दि.30/09/2022 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. या संदर्भात आयुक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्याकडुन हि मोहिम राबविण्याच्या सुचना प्राप्त आहेत. तसेच राज्यातील व शहरातील 100% नागरिकांची, जोखिमग्रस्त लोकसंख्या असणा-या भागांमध्ये कुष्ठरोग शोध मोहिम (LCDC) व सक्रिय क्षयरुग्ण शोध (ACF) 2022-23 राबविण्यात येणार आहे. या संदर्भात आरोग्य कुटुंब कल्याण मंऋाालय, भारत सरकार यांचेकडुन रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या जात आहेत. रोगशास्त्रीय अभ्यासानुसार क्षय आजाराचे रुग्ण निदान व औषधोपचारापासुन वंचित राहील्यास रुग्णाला या रोगापासुन निर्माण होणा-या गुंतागुंतीचा सामना तर करावाच लागतो त्याचप्रमाणे त्याच्या सहवासातील ईतर लोकांनासुध्दा या आजारांचा धोका संभवितो. म्हणुन समाजातील सर्व क्षयरुग्ण शोध घेवुन औषधोपचार चालु करणे हे अभियानाचे उददेश आहे. म्हणुन सदर मोहिम मनपा कार्यक्षेत्रात अतिजोखिम ग्रस्त लोकसंख्येत (उदा. झाोपडपटटी, विटाभटटी, भटक्या जमाती, कामासाठी स्थलांतरीत तसेच खाणीमध्ये काम करणारे कामगार, बेगर इ. सामाजिक गट तसेच तुरुंग, वृध्दाश्रम, आश्रमशाळा व वस्तीगृह, आदीवासी मुलांचे वसतीगृह, मनोरुग्णालय इ.) ठिकाणी ही मोहीम आपल्या शहरात राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत आशा स्वयंसेविका त्या भागातील घरोघरी भेट देवुन या आजारांच्या लक्षणांची माहिती देणार आहे व आजाराने ग्रसित असतील तर त्यांना पुर्णपणे माहिती देण्यात सहकार्य करावे व या मोहिमचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन राम जोशी, अपर आयुक्त, म.न.पा., नागपूर, डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, म.न.पा., नागपूर, डॉ. विजय जोशी, अति. वैद्यकिय आरोग्य अधिकारी, म.न.पा., नागपूर व डॉ. शिल्पा जिचकार, शहर क्षयरोग अधिकारी, म.न.पा. नागपूर व डॉ. वर्षा देवस्थळे, नोडल अधिकारी, कुष्ठरोग, म.न.पा. नागपूर यांनी केलेले आहे.