शहरातील ५ हजार ४५८ नागरिकांनी घेतला बाह्यसंपर्क आरोग्य शिबीराचा लाभ

नागरिकांच्या आरोग्यासाठी महानगरपालिकेतर्फे २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर

चंद्रपूर : शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चंद्रपूर शहर महानरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. २१ नोव्हेंबर ते सात डिसेंबरपर्यंत घेण्यात आलेल्या शिबिरात ५ हजार ४५८ नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या शिबिरात २ हजार ३७२ व्यक्तींनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेतली.

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत शेडमाके सभागृह महर्षी कर्वे वॉर्ड, हनुमान मंदिर चंद्रछाया मंगल कार्यालय महेश नगर, हनुमान मंदिर सपना टॉकीज जवळ जलनगर, शहिद भगतसिंग शाळा  भिवापुर वॉर्ड, टागोर शाळा विठ्ठल मंदिर, लुम्बिनी बौद्ध विहार माता मंदिर चौक, समस्काल दर्गा एकोरी वॉर्ड, सोहेल कुरेशी यांच्या घरी तुकुम तलाव, शालवन बौद्धविहार, दादमहल वॉर्ड, समाज मंदिर वैद्यनगर, डायमंड क्लब, प्रकाश नगर, प्रशिक बुध्द विहार, नगिनाबाग, गावंडे अंगणवाडी लालपेठ, गोपालकृष्ण मंदिर बालाजी वार्ड, राम मंदिर, भानापेठ वार्ड, तथागत बुध्द विहार नेहरुनगर, हनुमान मंदिर डॉ. आंबेडकर नगर, गौसिया मदरसा, रेहमतनगर, अष्टभुजा मंदिर, अष्टभुजा वार्ड, प्रेरणा बुध्द विहार रमानगर, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र ५, बाबुपेठ, हनुमानमंदिर, एकता चौक पोलीस लाईन, आदी ठिकाणी शिबिर घेण्यात आले. यात ५ हजार ४५८ नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी नोंदणी केली. यात २६३१ महिला, १७९० पुरुष, ४८४ मुले, ५५३ मुली यांचा समावेश आहे. यातील २१७ जणांना क्षयरोग, ७२ कुष्ठरोग, ३९५ मलेरियाचे रुग्ण आढळले. २५१२ व्यक्तीची रक्तदाब आणि २३३५ जणांची रक्तशर्करा तपासणी करण्यात आली. यातील ४२ जणांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या शिबिराच्या निमित्ताने १३४० जणांना कोरोनाची पहिली लस तर १०३२ जणांनी लसीची दुसरी मात्रा घेतली. यावेळी तज्ञ डॉक्टर मंडळींकडून आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात शेकडो नागरिकांनी रक्तदाब, शुगर, क्षयरोग, कोविड लसीकरण व आरोग्य विषयक तपासणी करून घेतली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

भाजपच्या अजेंड्यावर आम्हाला बदनाम करण्याचा उद्योग ईडीने बंद करावा - नवाब मलिक

Sun Dec 12 , 2021
ईडी कधी घरावर छापा टाकतेय याची पुष्पगुच्छ घेऊन वाट बघतोय.. किरीट सोमय्या यांना ईडीने अधिकृत प्रवक्ता म्हणून नियुक्तीपत्र द्यावे... मुंबई  – काही दिवसापासून ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना नवाब मलिक यांच्या घरावर छापा पडणार आहे अशा बातम्या पेरण्यात येत आहेत. त्यांनी बातम्या पेरून बदनामीचा उद्योग बंद करावा. काही असेल तर रितसर प्रेस नोट काढा आणि त्या बातम्यांची जबाबदारी स्वीकारा.भाजपच्या अजेंड्यावर आम्हाला बदनाम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com