उष्माघातापासून नागरिकांना मिळणार दिलासा

– बाजारपेठ, वर्दळीच्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

नागपूर :- वाढता उष्मा आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी उन्हाळ्यात उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळावा याकरिता विविध उपायायोजना केल्या जातात. या नियोजनासंदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी मंगळवारी (ता. १८) उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेतली.

अतिरिक्त आयुक्तांच्या सभाकक्षात आयोजित बैठकीत उपायुक्त विजय देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अल्पना पाटने, सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे, नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेतर्फे उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची शहरात दरवर्षी अंमलबजावणी केली जाते. बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांना सादरीकरणाद्वारे नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी बस डेपो, पेट्रोल पंप, बाजारपेठ, वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी याकरिता टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा तसेच मार्केट असोसिएशनशी चर्चा करून बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणी जागा निश्चित करावी असेही निर्देश त्यांनी दिले.

शहरातील सर्व उद्याने दुपारी १२ ते ४ वाजतापर्यंत सुरु ठेवावेत, टँकरच्या माध्यमातून रस्त्यावर पाण्याची फवारणी करावी, महत्वाच्या चौकात ग्रीन नेट लावण्यात यावी, विविध बांधकाम ठिकाणी कामगारांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी याकरिता कंत्राटदारांना संपर्क साधावा, रस्त्यावरील प्राण्यांकरिता आणि पक्षांकरिता महानगरपालिकेच्या विविध इमारती, शाळा या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, उद्यानांमध्येही पक्ष्यांकरिता पाणी उपलब्ध होईल अशी सुविधा तयार करावी तसेच रस्त्यावरील प्राण्यांकरिता शेल्टर होम तयार करण्यात यावे, त्यात योग्य वेटिंलेशनची दक्षता घ्यावी, आवश्यकता पडल्यास सामाजिक संघटनांची मदत घ्यावी असेही निर्देश अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी यावेळी दिले. मनपाच्या विविध इमारतींमध्ये मिस्टिंग कूलिंग लावण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी सूचना केली.

यावेळी समाज विकास विभागाचे प्रमोद खोब्रागडे, उद्यान विभागाचे संजय गुजर, जलप्रदाय विभागाचे प्रकाश यमदे, नरेंद्र भांडारकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे (अग्निशमन) सतीश रहाटे, स्लम विभागाचे एस. एस. चोमाटे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भाजपातर्फे अभिवादन

Wed Feb 19 , 2025
नागपूर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी सेतराम सेलोकर , सुरेश बारई, महेंद्र कठाणे, कांता रारोकर, प्रमोद पेंडके, सचिन चंदनखेडे, प्रवीण कांबळे, निरंजन दहिवाले, राकेश मेश्राम, रवी चवरे,गिरीश पिल्ले, मच्छिन्द्र सिल्वरू, आशा बोरकर,अतुल तिरपुडे, आशिष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!